शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना शिक्रापूर हद्दीतील चाकण चौकाजवळ तळेगाव रोडवर घडली आहे. याप्रकरणी बेकायदेशीर जमाव जमवून एकमेकांना शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्क्यांसह लाकडी बॅट आणि स्टंपने मारहाण केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्रापूर येथील चाकण चौकाजवळ तळेगाव रोडवर क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला. या वादातून आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून एकमेकांना शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले यावेळी हाताने लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी क्रिकेट बॅट आणि स्टंपने मारहाण करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या घटनेत काही जणांना दुखापत झाल्याने शिक्रापूर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणी मकसुद जाफरअली खान (वय २६), हमीद रियाज खान (वय २५), सलामत जाफरअली खान (वय २८), बिलाल बरकतअली खान (वय २२) आणि जावेद मुस्ताक शहा (वय २२, सर्व रा. महाबळेश्वर नगर, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांना तपासकामी अटक करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमनान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
View this post on Instagram
अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत.
संबंधित कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक शुभम कुमार आणि शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक जिनेश कोळी, पोलिस हवालदार अमोल दांडगे, बापू हाडगळे, शिवाजी चितारे तसेच पोलिस कॉन्स्टेबल नारायण वाळके, विकास बांगर, मच्छिंद्र निचीत आणि संतोष बाबर यांच्या पथकाने सहभाग घेत हे कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात
रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण
Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…
Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…