पाबळ: शिरूर तालुक्यातील केंदूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी मंगल अरुण साकोरे व उपसरपंच पदी कल्पना थिटे यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी मंगल साकोरे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला.
केंदूर ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी आपसात ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच व उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता.त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी मंगळवारी ग्रामपंचायत केंदूर कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.यावेळी सरपंच पदासाठी मंगल अरुण साकोरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी पाबळचे मंडळ अधिकारी प्रदीप लोखंडे यांनी मंगल साकोरे यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
यावेळी ग्रामपंचायत केंदूरचे ग्रामसेवक,आजी माजी सरपंच,उपसरपंच,सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सरपंच पदी निवड जाहीर झाल्या नंतर गावकऱ्यांनी भव्य मिरवणूक काढत साकोरे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित मंगल साकोरे यांनी दिली आहे.