shirur-tehsildar-car

शिरूर तहसिल कार्यालयात चक्क रात्रीस खेळ चाले…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तहसिल कार्यालय हे दिवसा नाही तर आधिकाऱ्यांमुळे चक्क रात्रीच्या वेळी सुरु होत असून आर्थिक मालिदा दिलेल्या अनेक फायलींवर तातडीने सह्या होत असल्याचे जागरूक नागरीकांनी सांगितले.

बदलीसाठी गेलेले पैसे वसुल करण्यात आधिकारी गुंग असून सामान्य माणूस यात मात्र नाहक भरडला जात आहे. गौणखणिज केसेस, रस्ता केसेस, १५५ च्या केसेस फाईलवर लक्ष्मी दर्शन न दिल्याने सह्या होत नाही. त्यामुळे नागरीक तहसिल कार्यालयात हेलपाटे मारुन बेजार झाले आहेत. दोन दिवसात रात्रीच्या वेळेस एजंटामार्फत येणाऱ्या लक्ष्मी दर्शनाने फाईलची तातडीने मार्गी लागत आहे. दक्षिणा न दिलेल्या फाईल अनेक दिवसांपासून तश्याच धुळ खात पडल्या आहेत.

अधिकाऱ्यांच्या मनमानी व अपमानास्पद वागणुकीमुळे तहसिल कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. तहसिल कार्यालयात तहसिलदार दिवसा काही वेळा उपस्थित नसतात. मात्र, रात्रीच्या वेळी अचानक हजर होऊन संबधित आस्थापनेच्या कमचार्यांना बोलवून घेत फाईलवर सहया होत असल्याने रात्रीस चांगलाच खेळ चालत असल्याचे एका जागरूक नागरीकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.

दरम्यान, शिरूर तालुक्यातील जनतेचे कामावाचून प्रचंड हाल होत असून, आगामी काळात याविरोधात मोठे आंदोलन छेडणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज, मनसेचे अविनाश घोगरे यांनी सांगितले.

शिरुर तहसिल कार्यालयात नागरीकांची होतेय आर्थिक लूट

शिरूर तालुक्यात होतोय रेशनचा मोठा काळाबाजार…

शिरूर तहसिल कार्यालयात तीन एंजट करताहेत नागरिकांची लूट…