अल्पवयीन मुलीस फुस लाऊन पळवणारे ते दोघे दीड महिन्यानंतर नाशिक येथे जेरबंद

क्राईम महाराष्ट्र

पोलिसांना दीड महिना देत होते गुंगारा

गेवराई: अल्पवयीन मुलीला फुस लाऊन पळवणा-या त्या दोघांना अखेर बुधवारी नाशिकमध्ये गेवराईच्या तलवाडा पोलीसांनी बेड्या ठोकल्या असून, गुन्हा दाखल झाल्यापासून ते दोघे पोलिसांना देत होते गुंगारा दीड महिन्यानंतर पोलीसांची कारवाई गोवर्धन यलदाळे, रा. रोहीतळ, ता. गेवराई व सतीश (मल्या) माळोदे रा. नाळवंडी, ता. बीड या दोघांनी एका अल्पवयीन मुलीस फुस लाऊन पळविले होते. या प्रकरणी गेवराईतील तलवाडा पोलीस ठाण्यात या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोघे फरार होते. तलवाडा पोलीस मागील हे त्यांचा कसून शोध घेत होते. मात्र, ते पोलीसांना गुंगारा देत होते. अखेर तांत्रिक माहितीच्या आधारावर अखेर बुधवारी परवा गोवर्धन यलदाळे व सतीश माळोदे या दोघांच्या अखेर पोलिसांनी नाशिक येथे मुसक्या आवळल्या.गुन्हा दाखल झाल्यापासून तब्बल दीड महिन्यानंतर या दोघांना जेरबंद करण्यात पोलीसांना यश आले.

पोलीस अधिक्षक नवनीत कॉंवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, गेवराईचे पोलिस उपविभागीय अधिकारी निरज राजगुरु, तलवाड्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर यांच्या मार्गदर्शनात फौजदार श्याम गायकवाड, पोलीस हवालदार हनुमान जावळे आणि विकास थोरात यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.