शिरूर : नारायणपूर येथे देवदर्शनासाठी गेलेल्या तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील दोन युवकांवर काळाने घाला घातला आहे. शिंदवणे घाटात त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे.
समीर संभाजी ढमढेरे (वय २१) आणि सार्थक विजय ढमढेरे (वय २०, दोघे रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघा युवकांची नावे आहेत. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळळा असून, परिसरात शोककळा पसरली आहे.
दीपक ढमढेरे, समीर ढमढेरे आणि सार्थक ढमढेरे हे तिघे मित्र एकाच दुचाकीवरून ११ डिसेंबर रोजी नारायणपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून तिघेही घरी परत येत होते. मात्र, शिंदवणे घाटातून जात असताना समोरून अतिवेगाने आलेल्या एका टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिघेही मित्र गंभीर जखमी झाले. यामध्ये समीर ढमढेरे आणि सार्थक ढमढेरे यांना डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. तर दीपक ढमढेरे किरकोळ जखमी झाला.
अपघात घडताच टेम्पो चालक आपला टेम्पो घटनास्थळी सोडून तात्काळ पळून गेला. परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे उपचार सुरू असताना मंगळवारी (ता. १६) समीर आणि सार्थक यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तळेगाव ढमढेरे आणि भीमाशेत परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी पळून गेलेल्या टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.
शिरुर! अष्टविनायक महामार्गावर सोने सांगवीजवळ अपघात…
Video; करडे-रांजणगाव अष्टविनायक महामार्गावर अपघात; भरधाव डंपरची घराला धडक
शिरूर-रामलिंग रोडवरील अपघातातील गंभीर जखमी युवक ठार…
रांजणगावच्या यात्रेत कारचा अपघात झाला अन्…; आदेश बांदेकरांनी सांगितला काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग
अष्टविनायक महामार्गावर कवठे येमाई हद्दीत भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चिमुरडयासह तीन जणांचा करुण अंत