मुंबई : धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत यंदा बोरिवली (पूर्व) येथील अभिनव विद्यामंदिरातील २०५ विद्यार्थी-विद्यार्थिनींना पाठ्यपुस्तके आणि शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखदार समारंभात पार पडला.यावेळी ट्रस्टचे विश्वस्त सुरेश डोंगरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत जोशी उपस्थित होते. तसेच रोटरी क्लब ऑफ मुंबई मलबार हिलच्या पल्लवी, निकिता, नयना, दीप्ती, लोमेश आणि सोहराब दावर यांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली.
याशिवाय ट्रस्ट लॉज क्रमांक ११३, लॉज फुलचंद पटेल क्रमांक १६३ चे सुभाष सराफ, आनंद गोखले, विनय जोग तसेच पुनीत ट्रस्टचे मिलन पारेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे संयोजन अभिनव विद्यामंदिरचे अमीन ठाकूर यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका पूजा देसाई, मुख्याध्यापक नाईक सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान दिले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळून त्यांच्या शिक्षणाला बळकटी मिळणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.