महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी; फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

महाराष्ट्र

मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त राज्यातील जिल्हा मुख्यालयांवर संबंधित पालकमंत्री आणि मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जारी केले आहे.

राज्याचा मुख्य शासकीय स्वातंत्र्यदिन समारंभ मुंबईतील मंत्रालयात सकाळी ९.०५ वाजता होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. पुणे येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री आणि मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे ठाणे, सुनेत्रा पवार बीड, चंद्रशेखर बावनकुळे नागपूर, राधाकृष्ण विखे-पाटील अहिल्यानगर, हसन मुश्रीफ नंदुरबार, चंद्रकांत पाटील सांगली, गिरीश महाजन नाशिक, गणेश नाईक पालघर, गुलाबराव पाटील जळगाव, दादाजी भुसे अमरावती, संजय राठोड यवतमाळ आणि उदय सामंत रत्नागिरी येथे ध्वजारोहण करतील.

याशिवाय जयकुमार रावल धुळे, पंकजा मुंडे जालना, अतुल सावे नांदेड, अशोक उईके चंद्रपूर, शंभूराज देसाई सातारा, आशिष शेलार मुंबई उपनगर, दत्तात्रय भरणे वाशिम, शिवेंद्रसिंहराजे भोसले लातूर, जयकुमार गोरे सोलापूर, नरहरी झिरवाळ हिंगोली, संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर, प्रताप सरनाईक धाराशिव, भरत गोगावले रायगड, मकरंद जाधव-पाटील बुलढाणा, नितेश राणे सिंधुदुर्ग, आकाश फुंडकर अकोला, प्रकाश आबिटकर कोल्हापूर, आशिष जयस्वाल गडचिरोली, माधुरी मिसाळ भंडारा, डॉ. पंकज भोयर वर्धा, मेघना बोर्डीकर परभणी आणि इंद्रनील नाईक गोंदिया येथे ध्वजारोहण करणार आहेत.

दरम्यान, कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. संबंधित पालकमंत्री किंवा मंत्री अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत, तर विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्त आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत