मोसंबी हे फळ मूळचे भारतीय नाहीच. मोझांबिक बेटाच्या नावावरुन याला मोसंबी हे नाव पडले. मोसंबी हे लिंबू वर्गातले आंबट- गोड फळ असून त्यात ए, बी, व सी जीवनसत्व आहे. शर्करा व फॉस्फरसचे प्रमाण अधिक आहे. खुपच गुणकारी आहे तर बघू या याचे अनमोल फायदे.
१) मोसंबी रस घेतल्यामुळे पोटातली आम्लता दूर होते. भूक लागते, व पचनाच्या तक्रारी दूर होतात. शरिरात कोणत्याही कारणाने रक्तदोष निर्माण झाल्यास मोसंबी रसाने दूर होतो..
२)शरिरावर आलेली सूज, वेदना यावर मोसंबी रस पोटातून घ्यावा आणि त्या भागावर हा रस लावावा.
३) ज्यांना घाम व दुर्गंधीचा त्रास आहे. त्यांच्याकरता मोसंबी रस ऊपयुक्त ठरतो. कारण यात असलेले मुबलक विटामिन सी हा त्रास दूर करते.
४) चेहऱ्यावर वांग, काळे डाग, ब्लेमिशेस यासारख्या त्वचेच्या समस्यांवर जर मोसंबी रस त्या प्रभावित जागेवर लावला तर आराम पडतो. हे विकार बरे होतात.
५) मोसंबीची साल सावलीत वाळवून त्याची साल मडक्यात घालून राख करावी. उलटी येत असल्यास १/२ चमचा राख मधातून उलटी थांबेपर्यंत १/१ तासाच्या अंतराने चाटवावी.
६) कफ प्रकृतीच्या व्यक्तींना शक्तिवर्धक म्हणून रस घेणे गरजेचे आहे. या रसात आल्याचा रस टाकून प्यावा. कफाचा प्रादुर्भाव होत नाही..
७) हृदयाला अतिशय हितकारक आहे.. छातीत धडधड होत नाही, अस्वस्थता दूर होते.
८) अरुचि, अजिर्ण, अपचन, मंदाग्नि यावर मोसंबी रस फायदेशीर ठरतो. जर भूक लागत नसेल तर मोसंबी रस, जीरे, काळे मीठ, व ओवा हे एकत्र करुन घेतल्यास पाचक रस सुटून जेवायची ईच्छा तयार होते.
९) अधिक परिश्रम झाल्यास घामामुळे शरिरातील जलांश कमी होतो, थकवा येतो. अश्या वेळी जर मोसंबी रसात ग्लुकोज टाकून घेतले तर तरतरी येते, उत्साह निर्माण होतो.
१०) वाळलेल्या मोसंबीची साल वाळवून हे चूर्ण शिकेकाईत उकळवून केसांना लावले तर केस निरोगी राहून , मजबूत होतात.
११) पित्ताची प्रकृति असणाऱ्यांनी मोसंबीचा रस घेणे हितकारक आहे. गँसेसची समस्या असल्यास मोसंबीच्या रसात मिरेपूड टाकून रस घ्यावा.
१२) याच्या सालीतून सुगंधी तेल मिळतं, तसेच मोसंबीच्या सालीचे चूर्ण फेसपॅकमध्ये वापरल्याने त्वचेवरील व्रण, मुरुमे, कमी होऊन सौंदर्य वाढतं. दिवसातून २-३ वेळा ओठांवर मोसंबीचा रस लावल्यास ओठांचा काळेपणा दूर होतो व मुलामय होतात.
१३) मोसंबीचा रस अतिज्वर, मुदतीचा ताप यात अतिशय लाभदायक ठरतो. याने ताकद येते, तोंडाला चव येते, आणि भरपूर विटामिन्स् असल्याने रुग्णाची तब्येत वेगाने बरी होते. तेव्हा अश्या गुणकारी फळाची महती बघता आपण बाराही महिने याचा उपभोग घेतला पाहिजे.
(सोशल मीडियावरुन साभार)