वर्किंग वूमन्सच्या बॅगमध्ये या वस्तू असायलाच हव्या, सेफ्टी-कम्फर्टसाठी आवश्यक…

आरोग्य

महिला घराबाहेर पडताना बॅग घेऊन जायला विसरत नाहीत. विशेषत: नोकरदार महिला ऑफिसला जाताना बहुतांश वस्तू हॅण्ड बॅगमध्ये ठेवतात. मात्र जर तुम्ही नोकरी करणारी महिला असाल तर तुमच्या बॅगमध्ये गोष्टी जरूर ठेवा.

फोन चार्जर:- अनेक वेळा महिला कामात व्यस्त असल्यामुळे फोन चार्ज करणे विसरतात. त्याचबरोबर तुमच्या सुरक्षिततेसाठी फोन चार्ज करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे हाताच्या पिशवीत चार्जर नेण्यास विसरु नका.

पेन-नोटपॅड:- नोकरदार महिलेच्या बॅगमध्ये पेन आणि नोटपॅड असणे आवश्यक आहे. त्यामुळे कार्यालयीन कामकाजादरम्यान इतरांकडून पेन-कागद घ्यावे लागत नाही. तसेच इतर ठिकाणीही ते उपयुक्त ठरतात.

रोख रक्कम:- आजच्या डिजिटल जीवनशैलीत बहुतेक लोक ऑनलाइन पेमेंट करण्यास प्राधान्य देतात. मात्र नोकरदार महिलांनी बॅगमध्ये थोडे सुटे पैसेही ठेवावेत. यामुळे तुम्हाला प्रवास करताना आणि इतर गोष्टींसाठीही ते कमी येतील.

हँकी, पेपर नॅपकिन:- ऑफिसला जाताना हॅन्की किंवा टिश्यू पेपर बॅगमध्ये ठेवा. अशा परिस्थितीत मेकअप साफ करण्यापासून ते हात पुसण्यापर्यंत तुम्ही रुमाल किंवा टिश्यू पेपर वापरु शकता.

इयरफोन्स:- अनेक वेळा महिला इयरफोन घरीच ठेवतात. मात्र ऑफिसमध्ये आपल्याला आवश्यक व्हॉइस नोट्स किंवा व्हिडिओसाठी ते कामी येऊ शकतात. त्यामुळे बॅगेत इअरफोन किंवा हेडफोन ठेवायला विसरु नका.

सॅनिटरी पॅड:- काहीवेळा महिलांची मासिक पाळीची तारीख चुकते. अशा परिस्थितीत जेव्हा अचानक मासिक पाळी येते. तेव्हा बॅगमध्ये सॅनिटरी पॅड्स असायलाच हवे.

सेफ्टी पिन:- तुम्ही घराबाहेर असताना सेफ्टी पिनही तुमच्या कामी येऊ शकते. फाटलेला ड्रेस, बॅगची चेन खराब होणे किंवा इतर कोणत्याही कामात सेफ्टी पिन खूप उपयुक्त ठरु शकते. त्यामुळे महिलांनी बॅगेत सेफ्टी पिन ठेवावी.

(सोशल मीडियावरुन साभार)