पौडमध्ये ११ लाखांच्या कुस्तीत राडा; समर्थकाने आखाड्यात घुसून हात उचलला, सिकंदर शेखची पहिली प्रतिक्रिया

पुणे: महाराष्ट्राचा प्रसिद्ध मल्ल आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला सिकंदर शेख गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौड येथे महाशिवरात्री निमित्त आयोजित करण्यात आलेल्या मल्लिकार्जुन कुस्ती किताब स्पर्धेत ११ लाख रुपयांची प्रमुख कुस्ती रंगली होती. या लढतीत सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे आमनेसामने आले होते. मात्र, सामन्यादरम्यान झालेल्या वादामुळे काही काळ तणावाचे […]

अधिक वाचा..

‘छोटा डॉन’चा मोठा खुलासा! बिग बॉस मराठीच्या घरात नवा स्फोट

मुंबई: छोटया पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस मराठीचे सहावे पर्व सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. प्रत्येक आठवड्यात नवे ट्विस्ट आणि नवे वाद समोर येत असताना यंदाच्या सिझनमधील सर्वात लहान वयाचा स्पर्धक प्रभू शेळके उर्फ ‘छोटा डॉन’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. घरातील सगळ्यात लहान सदस्य असला तरी प्रभूची निरीक्षणशक्ती मात्र […]

अधिक वाचा..

९ कोटींच्या कर्जप्रकरणी जामिनावर बाहेर; राजपाल यादवने तोडले मौन, ‘इंडस्ट्री माझ्या पाठीशी’

मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजपाल यादव सध्या ९ कोटी रुपयांच्या कर्ज आणि चेक बाउंस प्रकरणामुळे चर्चेत आहे. तिहार तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर राजपालने पहिल्यांदाच या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. अडचणीच्या काळात काही मोठ्या कलाकारांनी मदत केल्याच्या चर्चांवर बोलताना राजपाल म्हणाला की, “मी मिळालेल्या प्रत्येक मदतीचा आदर करतो. मात्र मला सहानुभूती नको आहे. […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदेंना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांनाही भेटेन! प्रत्येक भेटीत राजकारण शोधू नका; राज ठाकरे

ठाणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील ‘नंदनवन’ या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. संभाव्य आघाडी किंवा नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली असताना राज ठाकरेंनी स्वतः पुढे येत या भेटीमागील कारण स्पष्ट केले. “निवडणुका आत्ता नाहीत; सूचना देण्यासाठी भेटलो” राज ठाकरे म्हणाले, “आपल्याकडे पूर्वीसारखं निकोप राजकारण […]

अधिक वाचा..

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मला फॉलो केल; अशोक सराफ यांचा खुलासा म्हणाले…

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. विनोदी असो वा गंभीर भूमिका, त्यांनी प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्या खास शैलीत जिवंत केली. त्यांच्या समकालीन आणि तितक्याच लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी मनमोकळेपणाने भाष्य केले. ते म्हणाले, […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ! महायुतीत तणाव; मंत्री भरत गोगावले यांचा भाजप-राष्ट्रवादीला थेट इशारा

रायगड: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी घडामोड रायगड जिल्ह्यातून समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर महायुतीतील तणाव उघडपणे समोर येऊ लागला असून, महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना थेट इशारा दिला आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवत भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येत असल्याची […]

अधिक वाचा..

भाजप प्रवक्त्याचा कॉल अन् काळ्या फॉर्च्युनर एसयूव्हीचा थरारक पाठलाग

धुळे: धुळे तालुका पोलिसांनी श्रीरामपूर येथील खूनप्रकरणातील फरार आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी ११२ या आपत्कालीन क्रमांकावर केलेल्या फोनमुळे पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आणि आरोपीपर्यंत पोहोचणे शक्य झाले. मिळालेल्या माहितीनुसार, अजित चव्हाण हे एका अंत्यविधीसाठी धुळे येथे आले होते. त्यावेळी मालेगावकडून येणारी काळ्या रंगाची, बिननंबरची […]

अधिक वाचा..

शिक्षण सेवकांसाठी मोठा दिलासा! तीन वर्षांचा कालावधी पुन्हा पूर्ण करावा लागणार नाही

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि १०० टक्के अनुदानित शाळांमध्ये लागू असलेल्या शिक्षण सेवक योजनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर केला असून, या निर्णयामुळे हजारो शिक्षण सेवकांना मोठा दिलासा मिळणार आहे. काय आहे नवा निर्णय? सन २००० पासून राज्यात शिक्षण सेवक योजना लागू आहे. या योजनेनुसार उमेदवारांना […]

अधिक वाचा..

छगन भुजबळ यांना अचानक अस्वस्थता; मुंबईत उपचारासाठी रवाना

मुंबई: राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यानंतर त्यांना तातडीने Apollo Hospitals येथे नेण्यात आले, जिथे सिटीस्कॅनसह प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या. पुढील उपचारांसाठी त्यांनी नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द करून मुंबईकडे प्रस्थान केले आहे. या […]

अधिक वाचा..

‘बिग बॉस मराठी: ‘काटा गँग’मध्ये फूट? तन्वी-प्रभूच्या नात्यात दुरावा; राखीच्या वक्तव्याने घरात खळबळ

मुंबई: ‘बिग बॉस’ हा असा खेळ आहे, ज्यात क्षणाक्षणाला समीकरणे बदलतात. मैत्रीचे रूपांतर शत्रुत्वात होते, तर शत्रूही कधी मित्र बनतात. त्यामुळेच या खेळात अनपेक्षित ट्विस्ट पाहायला मिळतात. सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वातही असाच एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. घरात सध्या तीन गट स्पष्टपणे दिसत असून त्यातील ‘काटा गँग’मध्ये राकेश बापट, तन्वी कोलते, दीपाली […]

अधिक वाचा..