अजितदादांचा विमान अपघात घातपातच? रोहित पवारांचा ठाम आरोप; शरद पवारांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

मुंबई: उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. हा अपघात घातपाताचा असल्याचा संशय व्यक्त करत तज्ज्ञ समितीमार्फत स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार Rohit Pawar यांनी ठामपणे केली आहे. मुंबईत तिसरी पत्रकार परिषद; प्रेझेंटेशनद्वारे मांडले मुद्दे रोहित पवार यांनी मुंबईत तिसरी पत्रकार परिषद घेत […]

अधिक वाचा..

‘माझ्या बायकोचे नाव जिनिलिया आहे, जेनेलिया नाही; रितेश देशमुख यांचा खुलासा

मुंबई: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणारा अभिनेता रितेश देशमुख सध्या दोन कारणांमुळे चर्चेत आहे. एकीकडे तो ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असून त्याचा लूक समोर आला आहे; तर दुसरीकडे त्याने पत्नीच्या नावाबाबतचा गैरसमज दूर केला आहे. रितेशची पत्नी जिनिलिया देशमुख हिला अनेकदा ‘जेनेलिया’ असे संबोधले जाते. मात्र एका […]

अधिक वाचा..

‘अ‍ॅनिमल’नंतर बॉबी देओल चा नवा धमाका! ‘बंदर ’चे पोस्टर रिलीज

मुंबई: बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल सध्या यशाच्या शिखरावर आहे. ‘ऍनिमल’ या चित्रपटातील त्याच्या प्रभावी भूमिकेमुळे तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या चर्चेत आला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठा गाजावाजा करत जबरदस्त कमाई केली आणि बॉबीच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली. ‘अ‍ॅनिमल’च्या यशानंतर आता बॉबी देओलचा आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट समोर आला आहे. ‘बंदर’ असे या आगामी हिंदी चित्रपटाचे […]

अधिक वाचा..

‘धर्मवीर’साठी १७ पुरस्कार मिळाले, पण राष्ट्रीय पुरस्कार हुकल्याची खंत; प्रसाद ओक

मुंबई: धर्मवीर आणि धर्मवीर २ या दोन्ही मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनात जबरदस्त छाप पाडली. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटांची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. निर्माते मंगेश देसाई यांनी या चित्रपटांची निर्मिती केली. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांची भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांच्या दमदार अभिनयासाठी […]

अधिक वाचा..

पाण्याचा अंदाज चुकला अन्न पवना धरण परिसरात तरुणाचा बुडून मृत्यू 

पुणे: मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. धरणात बुडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून ऋतिक कैलास साखरे असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ऋतिक साखरे हे आपल्या काही मित्रांसह पर्यटनासाठी पवना धरण परिसरात आले होते. निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज कामात सहकार्य मिळाल्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण होतील. जोडीदाराकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. घरात गुंतवणुकीबाबत चर्चा होऊ शकते. ऑनलाइन व्यवसाय आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होईल. वृषभ: मानसिक शांतता आणि समाधान लाभेल. व्यवसायात नवीन डील होण्याची शक्यता आहे. राजकारण किंवा सरकारी क्षेत्राशी संबंधितांना यश मिळेल. शेती, धातू, बांधकाम आणि आयात क्षेत्रात लाभाचे […]

अधिक वाचा..

सांगली जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेचा तिढा कायम; राष्ट्रवादीत खल, अंतिम निर्णय सुनेत्रा पवारांकडे

सांगली: सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसतानाही सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून महायुती म्हणून सत्ता स्थापन करण्याचा विश्वास व्यक्त केला जात असला, तरी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत मात्र एकमत झालेलं नाही. सहा सदस्य आणि सहा नेते अशी परिस्थिती निर्माण झाल्याने अंतर्गत चर्चा आणि बैठकींचे सत्र सुरू आहे. राष्ट्रवादीत अंतर्गत खलबते […]

अधिक वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमात प्रोटोकॉल भंग? सुनेत्रा पवारांना थांबावे लागल्याने राजकीय चर्चा

पुणे: छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात कथित प्रोटोकॉल भंगाचा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी अचानक भाषण सुरू केल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना काही क्षण ताटकळत उभे राहावे लागल्याची घटना समोर आली आहे. कार्यक्रमात भाषणांचा क्रम सुरू असताना आमदार शरद सोनवणे यांनी आपले मनोगत संपवून […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या विमान अपघातावर रितेश देशमुखांची प्रतिक्रिया म्हणाले…

मुंबई: अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्यात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुर्घटनेबाबत आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, ब्लॅक बॉक्स संदर्भात प्रश्न निर्माण होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी यापूर्वी दिला होता. दरम्यान, तपास यंत्रणांनी आगीत ब्लॅक बॉक्सला बाधा झाल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र […]

अधिक वाचा..

माजी जवानाचा आदर्श; दुग्धव्यवसायातून वर्षाला ७ ते ९ लाखांचे उत्पन्न

मायणी: नोकरीनंतरही शेतीकडे वळून यश संपादन करणाऱ्यांची अनेक उदाहरणे आहेत. त्यात मायणी येथील सचिन आनंदराव माने-पाटील यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. सैन्यात २० वर्षे सेवा पूर्ण करून हवालदार पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी इतरत्र नोकरी करण्याऐवजी शेतीसोबत गायी पालनाचा व्यवसाय सुरू केला आणि आज त्यातून वर्षाला सात ते नऊ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. सचिन माने-पाटील […]

अधिक वाचा..