राज्यभरात २९ सप्टेंबरला ‘रोजगार महाकुंभ’; महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा; चंद्रकांत पाटील

मुंबई: राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरात ‘रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमात महाविद्यालयांनी सक्रिय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. मंत्रालयात मंत्री चंद्रकांत पाटील […]

अधिक वाचा..

युद्धजन्य परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्के दराने वाढतेय; एकनाथ शिंदे

ठाणे : जगातील अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना आणि त्याचा विविध अर्थव्यवस्थांवर परिणाम होत असतानाही भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्के जीडीपी वाढीसह मजबूतपणे पुढे जात आहे. ही देशाच्या आर्थिक प्रगतीची आणि स्थैर्याची सकारात्मक बाब असून, ‘विकसित भारत २०४७’च्या संकल्पाच्या दिशेने भारताने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. […]

अधिक वाचा..

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल

नाशिक : आदिवासी विद्यार्थी गेल्या १५ ते २० दिवसांपासून विविध मागण्यांसाठी उपोषण आणि आंदोलन करत असताना भाजपा महायुती सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. राहुल गांधी यांनी पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्यानंतर सरकार घाईघाईने त्यांच्या मागण्या मान्य असल्याचे सांगत आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनावर […]

अधिक वाचा..

वरळीत कचरा अन् दुर्गंधीचे साम्राज्य; शिवसेना ॲक्शन मोडवर, वर्षभर ‘स्वच्छ वरळी’ अभियान

मुंबई : स्थानिक आमदारांच्या दुर्लक्षामुळे वरळी परिसरात कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याचा आरोप करत शिवसेनेने आता स्वच्छता मोहिमेची धुरा हाती घेतली आहे. शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निर्देशानंतर पक्षाचे पदाधिकारी ॲक्शन मोडवर आले असून, मंगळवारी वरळी कोळीवाडा आणि समुद्रकिनारी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी या अभियानात […]

अधिक वाचा..

प्रारूप मतदार यादीवर काँग्रेसचा आक्षेप; ‘नोटीस मिळणाऱ्या मतदारांची बूथनिहाय यादी जाहीर करा’

मुंबई: एसआयआर (Special Intensive Revision) मोहिमेंतर्गत महाराष्ट्रातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत संशयास्पद (Anomalous) आणि ‘Unmapped’ मतदारांची नावे समाविष्ट आहेत. मात्र, या नावांवर कोणत्याही प्रकारची खूण करण्यात आलेली नसल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केला आहे. या मतदारांना नोटीस बजावून सुनावणीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे सांगण्यात […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांची तत्परता; हरवलेली वृद्धाची बॅग एका तासात शोधून केली स्वाधीन

शिरुर (तेजस फडके) एका वृद्ध व्यक्तीची हरवलेली बॅग तत्परतेने शोधून अवघ्या एका तासात संबंधित व्यक्तीच्या स्वाधीन करण्याची कामगिरी शिरुर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी केली. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे वृद्ध व्यक्तीला मोठा दिलासा मिळाला. हरवलेली बॅग पुन्हा मिळाल्याने संबंधित वृद्ध व्यक्तीने शिरुर पोलिसांचे आभार मानले. पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे त्यांची मोठी अडचण दूर झाली. एका वृद्ध व्यक्तीची बॅग हरवली […]

अधिक वाचा..

फडणवीसांइतकेच विलासराव देशमुखही माझे आवडते मुख्यमंत्री; मुरलीधर मोहोळांचं मोठं वक्तव्य

पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच आपले आवडते मुख्यमंत्री होते, असे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले. जय वैभवलक्ष्मी फाउंडेशनच्या वतीने आयोजित विशेष सोहळ्यात माजी आमदार दिलीप देशमुख यांना ‘सहकार भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मोहोळ बोलत होते. महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा देताना मोहोळ […]

अधिक वाचा..
anubhavanchya-paulkhuna

शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या विविध कार्यांच्या माध्यमातून केलेल्या कामात आलेल्या अनुभवांतून लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ या पुस्तकाचे रविवारी (ता. ३०) प्रकाशन करण्यात आले. ईश्वरी प्रकाशन, पुणे यांच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे […]

अधिक वाचा..
body

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना समोर आली. नदीच्या प्रवाहात तरंगत असलेला एका ३० ते ३५ वर्षीय अज्ञात पुरुषाचा मृतदेह अचानक समोर आला. धक्कादायक बाब म्हणजे, या पुरुषाचे हात-पाय दोरीने घट्ट बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. नदी पात्रात फुगलेल्या आणि छिन्नविछिन्न अवस्थेत […]

अधिक वाचा..

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी शाकाहारी आहाराने तुम्ही स्नायू मजबूत करू शकता हे तुम्हाला माहित आहे का? नसेल माहिती तर चिंता नका करू. शाकाहारी आहारात प्रथिने देखील भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे स्नायू तयार होण्यास आणि शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. जर तुम्ही शाकाहारी असाल किंवा […]

अधिक वाचा..