लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार; नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा

रत्नागिरी: शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून २०२१ ते २०२६ या कालावधीत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित महाविद्यालयातील एका प्राध्यापकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात, विशेषतः शिक्षण क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जात […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या निधनानंतर रोहित पवारांचे महाराष्ट्रला भावनिक आवाहन; म्हणाले…

पुणे: बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघाताने महाराष्ट्राच्या राजकारणाला जबर धक्का दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे प्रचारासाठी निघाले होते. सकाळी 8.15 वाजता मुंबई विमानतळावरून उड्डाण झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात, सकाळी 8.45 च्या सुमारास बारामतीच्या धावपट्टीजवळ विमान कोसळले.  या दुर्घटनेत अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. राज्यासाठी हा केवळ अपघात नव्हता, तर प्रभावी नेतृत्व अचानक हरपल्याचा […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला मोठे बळ; माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे शिवसेनेत प्रवेशाच्या तयारीत

मुंबई: जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढण्याची शक्यता असून माजी आमदार व शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे हे अख्ख्या पक्षासह शिवसेनेत विलीन होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी नांदेड जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शंकरअण्णा धोंडगे यांनी […]

अधिक वाचा..

पीक पोषण शिखर परिषदेमुळे ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला बळ; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: ‘कन्वर्ज, कोलॅबोरेट अँड को-क्रिएट’ ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. इंडियन मायक्रो फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या मुंबईत आयोजित परिषदेच्या माध्यमातून या संकल्पनेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला. इंडियन मायक्रो फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयएमएमए) यांच्या वतीने मुंबई […]

अधिक वाचा..

काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी चिपळूण येथे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर

मुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी चिपळूण येथे पार पडणार असून, या तीन दिवसीय शिबिरात कोकण विभागातील नवनिर्वाचित प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या प्रशिक्षण शिबिराला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन […]

अधिक वाचा..

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करण्याचा संकल्प; एमआयडीसी, आयटी पार्क व पायाभूत सुविधांचे आश्वासन जुन्नर: स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे हे आमचे भाग्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचार दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी जुन्नर येथे झालेल्या जाहीर सभेत ते […]

अधिक वाचा..

चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचा तिढा सुटला! राजेश अडूर गटनेते, उपमहापौरपदी वसंत देशमुखांचा अर्ज

नागपूर: चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षातील सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. काँग्रेसचे गटनेते म्हणून राजेश अडूर यांची नियुक्ती करण्यात आली असून उपमहापौरपदासाठी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार गटाचे वसंत देशमुख यांनी अर्ज दाखल केला आहे. आज सायंकाळी पाच वाजता काँग्रेसची अधिकृत गटनोंदणी होणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस […]

अधिक वाचा..

समृद्ध, सक्षम आणि संवेदनशील महाराष्ट्रासाठी भविष्यातील विकास आराखड्याची घोषणा

मुंबई: भविष्यातील महाराष्ट्र कसा असावा, याचा सविस्तर विकास आराखडा मांडण्यात आला असून “समृद्ध, सक्षम आणि संवेदनशील महाराष्ट्र” ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारा हा दृष्टिकोन असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या आराखड्यात सर्वसमावेशक व लोककेंद्रित विकास हा प्रमुख मुद्दा असून, विकासाचा लाभ शेवटच्या […]

अधिक वाचा..

ऑनलाईन गेमिंगचा घातक विळखा! तीन सख्ख्या बहिणींनी गमावलं आयुष्य, पालकांमध्ये भीती

गाझियाबाद: ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळे लहान मुलांचे आयुष्य धोक्यात येत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. गाझियाबादमधील भारत सिटी सोसायटीत तीन सख्ख्या अल्पवयीन बहिणींनी ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊन टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मृत मुलींचं वय अनुक्रमे १६, १४ आणि १२ […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव विकासाचा ब्लूप्रिंट जाहीर

आंबेगाव: गावागावांचा विकास करणे हा शिवसेनेचा ध्यास असून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांना बळ देऊन ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास घडवून आणू, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. आंबेगाव येथे उमेदवारांच्या प्रचारसभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सभेच्या सुरुवातीला नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांनी सांगितले की, लोकसभा-विधानसभा निवडणुकांत कार्यकर्त्यांनी […]

अधिक वाचा..