मानधन योजना अडचणीत! सांस्कृतिक कार्य खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे लोककलावंत हैराण

मुंबई: राज्यातील राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेची अंमलबजावणी सांस्कृतिक कार्य खात्याच्या ढिसाळ आणि असंवेदनशील कारभारामुळे गंभीर अडचणीत सापडली आहे. अनेक जिल्ह्यांत अद्याप मानधन निवड समित्याच गठीत झालेल्या नसून, सन २०२३ पासूनचे ऑफलाईन (प्रत्यक्ष) अर्ज धूळखात पडून असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. त्यामुळे हजारो लोककलावंतांना मानधनासाठी प्रतीक्षा करावी लागत असून राज्यभर […]

अधिक वाचा..

विरोधासाठी विरोध नको! ‘दावोस’कडे राजकारणापेक्षा महाराष्ट्र हिताने पाहण्याची गरज

मुंबई (शितल करदेकर): महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने ‘दावोस’ हा केवळ परदेश दौरा नसून एक महत्त्वाचे जागतिक व्यासपीठ आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या दौऱ्यावरून सुरू असलेली राजकीय टीका ही विरोधासाठी विरोध या चौकटीत अडकलेली दिसते. प्रश्न उपस्थित करणे आवश्यक आहेच, पण महाराष्ट्राची प्रतिमा धूसर होईल असा बोंबाबोंब करणारा विरोध कितपत योग्य आहे, याचे […]

अधिक वाचा..

महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर; छत्रपती संभाजीनगरसह 29 महापालिकांतील प्रवर्ग निश्चित

मुंबई: महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर महापौरपदासाठीची आरक्षण सोडत आज मुंबईत जाहीर करण्यात आली. या सोडतीमुळे राज्यातील प्रत्येक महानगरपालिकेत कोणत्या प्रवर्गातील महापौर निवडला जाणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक महापालिकांमध्ये महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गाचा महापौर? छत्रपती संभाजीनगर – खुला प्रवर्ग […]

अधिक वाचा..

ड्रग्ज रॅकेटमध्ये नगरचा पोलीसच मुख्य सूत्रधार

जप्त केलेला एमडी ड्रग्जचा मुद्देमाल काळ्या बाजारात विकल्याचा गंभीर आरोप शिरूर (अरुणकुमार मोटे):  पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांनी उघडकीस आणलेल्या तब्बल २० कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्ज प्रकरणाने राज्याच्या पोलीस यंत्रणेला हादरवून सोडले आहे. या प्रकरणात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारीच ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचा धक्कादायक खुलासा झाला असून, श्यामसुंदर रामदास […]

अधिक वाचा..

अखेरच्या दिवशी शक्तीप्रदर्शनाची धग; शिरूर तहसील परिसरात जत्रेचे वातावरण

शिरूर (अरुणकुमार मोटे): जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शिरूर तालुक्यात राजकीय वातावरण अक्षरशः तापले होते. सर्वच प्रमुख पक्षांसह अपक्ष इच्छुकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केल्याने तहसील कार्यालय परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. ढोल-ताशे, घोषणा, वाहनांच्या रांगा आणि कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी यामुळे संपूर्ण परिसर गजबजून गेला होता. शिरूर […]

अधिक वाचा..

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी! तिरंगा फडकवण्यामागील महत्त्वाचा फरक

मुंबई: स्वातंत्र्यदिन (15 ऑगस्ट) आणि प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) आपल्या सर्वांच्या बालपणातील गोड आठवणींशी निगडीत आहेत. शाळा-कॉलेजमध्ये पांढरे कपडे घालून मैदानात जमून तिरंग्याला सलामी देणे, नंतर मिळणाऱ्या चॉकलेट्सची मजा हे सगळं आजही मनात ताजं राहते. मात्र, या दोन राष्ट्रीय दिवसांवर राष्ट्रध्वज फडकवण्याची पद्धत आणि त्यामागील अर्थ वेगळा असतो, जे अनेकांना माहित नसते. ध्वजारोहण आणि ध्वज […]

अधिक वाचा..

पॉलिटिकल कनेक्शनमुळे आरोपी मोकाट! सत्ताधारी पक्षाचा वरदहस्त म्हणून कायद्याचा धाक संपला का

मुंबई उच्च न्यायालयाचा पुणे पोलिसांवर संताप; शिंदे गटाच्या नेत्याच्या कुटुंबाचा अटकपूर्व जामीन फेटाळला पुणे: “सत्ताधारी पक्षाशी संबंध असल्यामुळे आरोपींना कायद्याची भीती उरलेली नाही का?” असा संतप्त सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खेड येथील शिवसेना (शिंदे गट) नेते अनिल लोखंडे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन फेटाळताना न्यायालयाने अत्यंत […]

अधिक वाचा..

माणुसकीला काळिमा! पतीवरच्या रागातून आईकडून दीड वर्षांच्या चिमुरडीची निर्घृण हत्या

लातूर: लातूर शहरातील श्यामनगर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. पती घरी उशिरा परतल्याच्या रागातून एका आईने आपल्या दीड वर्षांच्या चिमुरडीची निर्दयीपणे हत्या केल्याने संपूर्ण लातूर शहर हादरले आहे. अश्विनी चौगुले (वय अंदाजे २५) असे आरोपी महिलेचे नाव असून, तिने नंदिनी नावाच्या आपल्या १८ महिन्यांच्या मुलीवर चाकूने सपासप वार करत तिचा जीव घेतला. […]

अधिक वाचा..

उमेदरीवरून राजकीय उलथापालथ! काळे गटाचा भाजमध्ये प्रवेश; भाजप–राष्ट्रवादी थेट आमनेसामने

पंढरपूर: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यात बुधवारी मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे, समाधान काळे व गणेश पाटील यांनी समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. उमेदवारीवरून राष्ट्रवादीत झालेल्या कोंडीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे यांना वाखरी तर गणेश पाटील […]

अधिक वाचा..

गणेश चतुर्थी आणि गणेश जयंतीमधील फरक काय?

माघी गणेशोत्सवाचे महत्त्व, पूजा नियम आणि 2026चा शुभ मुहूर्त मुंबई: भारतीय संस्कृतीत भगवान गणेशाला प्रथमेश मानले जाते. कोणतेही शुभ कार्य गणपती पूजनाशिवाय पूर्ण मानले जात नाही. वर्षातून दोन वेळा गणरायाचा मोठ्या श्रद्धेने उत्सव साजरा केला जातो. एक म्हणजे भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी आणि दुसरा म्हणजे माघ महिन्यातील गणेश जयंती. मात्र अनेकदा या दोन्ही सणांमध्ये नेमका […]

अधिक वाचा..