अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई येथे उघड्या चेंबरमुळे अपघातांची मालिका

सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्याप जाग येईना शिरूर (अरुणकुमार मोटे): अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई येथील उघड्या चेंबरमुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. गेल्या सात दिवसांत येमाई मंदिर चौकाजवळ रामदेव बाबा स्टील दुकानाच्या समोरील याच उघड्या चेंबरमुळे दोन अपघात घडले आहेत. वारंवार ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवूनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याने स्थानिक नागरिकांनी […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल 

मेष: आपला आजचा दिवस फार आव्हानात्मक असेल त्यामुळे सतर्क राहून काम करा. तुमच्या समोर बऱ्याच जबाबदाऱ्या असतील आणि फार मेहनत घेवून काम करावे लागेल.ऑफिसमध्ये काम वाढत असून तुमच्यावर कामाची जास्त जबाबदारी असेल. दरम्यान सहकाऱ्यांची मदत मिळणार नाही. पण तुम्ही काळजी करू नका सगळ्या जबाबदाऱ्यांवर तुम्ही खरे उतरणार आहात. तसेच प्रत्येक कामात यश असून आजचा दिवस […]

अधिक वाचा..

शिरुर-आंबेगाव शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुखपदी गंगुबाई शेळके यांची निवड

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर–आंबेगाव तालुक्यात शिवसेनेने महिला संघटन बळकटीकरणासाठी निर्णायक पाऊल टाकले असुन, सोनेसांगवी येथील विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालिका गंगुबाई हनुमंतराव शेळके यांची शिवसेना महिला आघाडी शिरुर–आंबेगाव तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या अधिष्ठानावर, धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतुन आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे मुख्य […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपात प्रवेश…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीतील दोन विद्यमान सदस्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असुन या घडामोडीमुळे गावातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहे. यातील एक विद्यमान ग्रामपंचायत सदस्याने मानसिंग पाचुंदकर यांच्या पॅनल मधुन निवडणुक लढवलेली आहे. रांजणगाव गणपतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हर्षल गदादे, माजी ग्रामपंचायत सदस्य आनंदा […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील महसूल प्रशासनातील कर्मचारी सामुहीक रजेवर

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्याचे महसुलमंत्री यांनी १२ डिसेंबर २०२५ रोजी मावळ तालुक्यातील मुरूम उत्खनन प्रकरणी तहसीलदार, मंडल अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाईकेली आहे. त्यामुळे महसूल विभागात तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट राज्य ग्राम महसुल अधिकारी व मंडल अधिकारी संघ,शारवा शिरूर यांनी विनाकारण व अन्यायकारक पद्धतीने करण्यात आलेल्या कारवाईमुळे दि. १५ […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात गाईची शिकार करताना बिबट्या पडला विहिरीत…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ढाकी वस्ती परिसरात रविवारी (ता. १४) सायंकाळी गाईचा पाठलाग करताना एक बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली. मात्र, विहिरीतील पाण्याची पातळी जास्त असल्याने आणि वीजपंपाच्या पाईपच्या साहाय्याने बिबट्याने विहीरीतून वर येत शिताफीने पलायन केले. कवठे येमाई येथील ढाकी वस्तीवरील सोपान मुखेकर यांच्या मालकीच्या विहिरीत हा प्रकार घडला. सायंकाळी […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात ५३ वे बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन, १७ व १८ डिसेंबरला करडे येथे आयोजन

शिरूर (अरुणकुमार मोटे): विकसित आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती व सर्जनशीलता विकसित करण्याच्या उद्देशाने ५३वे शिरूर तालुकास्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन येत्या १७ व १८ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री भैरवनाथ विद्यालय, करडे येथे हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या विज्ञान प्रदर्शनाच्या नियोजनाबाबतची […]

अधिक वाचा..

महाज्योती कडून राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण ऑफलाईन करावे

विद्यार्थ्यांचे विद्यावेतन देण्यात अजून आलेले नाही,ते ही देण्यात यावे नागपूर: ओबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या महाज्योती मार्फत स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण योजना राबवण्यात येते. आता ही योजना ऑनलाइन राबवण्यात येणार आहे. जी संस्था हे काम करणार ती राजस्थानची आहे,त्याऐवजी हे प्रशिक्षण ऑफलाईन देण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात वडेट्टीवार यांनी ओबीसी विद्यार्थ्यांचा […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस चांगला असून मालमत्तेशी संबंधित क्षेत्रांमध्ये उत्तम लाभ मिळेल. कुटुंबाच्या आशीर्वादामुळे आणि पाठिंब्यामुळे तुमचा गौरव होणार आहे. तुम्ही समाजात लोकप्रिय होणार आहात. सायंकाळी घरातील सदस्याच्या शारीरिक त्रासामुळे थोडं टेन्शन वाटेल मात्र रात्रीपर्यंत परिस्थिती पुन्हा सामान्य होईल. नोकरीच्या ठिकाणी वातावरण सकारात्मक असेल. वृषभ: आजचा दिवस ठिक असून गोड बोलून विरोधकांवरमात करावी लागेल. ऑफिसबरोबर घरातील […]

अधिक वाचा..

महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क

मुंबई: मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण २९५ एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क उभारले जाणार आहे. प्रस्तावित सेंट्रल पार्कचा आराखडा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर करण्यात आला. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, आर्किटेक्ट हाफीज कॉन्ट्रैक्टर उपस्थित होते. मुंबईकरांसाठी आजवरचे हे सर्वात मोठं गिफ्ट असून हे या ठिकाणी कोणतंही कॉक्रिटचं […]

अधिक वाचा..