टाकळी हाजीतील आरोग्य अधिकाऱ्यांची सेवा ‘रामभरोसे’;  ग्रामस्थांकडून बेजबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कामात दिरंगाई व कर्तव्यात हलगर्जीपणा होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांमधून होत असून आधिकारी निवासी राहत नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात अधिकारी दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची वरीष्ठ अधिकार्यांनी […]

अधिक वाचा..

काँग्रेसचा २८ ऑगस्टला नांदेडच्या पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा

गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यांची समिती. मुंबई: नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका नांदेड जिल्ह्याला बसलेला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून उभी पिकं वाया गेली आहेत. नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेवरून एक समिती गठीत केली असून ही समिती गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी नांदेड […]

अधिक वाचा..

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे काम दर्जेदार पद्धतीने करावे: उपमुख्यमंत्री अजित पवार

अंबाजोगाई येथे सुसज्ज असे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे मुंबई: मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी यासाठी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे सुसज्ज शासकीय रुग्णालय उभारण्यात यावे. तसेच स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे काम दर्जेदार पद्धतीने करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. स्वामी […]

अधिक वाचा..

मुघलांना जसे धनाजी संताजी दिसायचे तसे फडणविसांना राहुल गांधीच दिसतात

छत्रपती संभाजीनगर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राहुल गांधी द्वेषाची काविळ झाली असून मोघलांना जसे धनाजी संताजी दिसत होते तसे भाजपा व देवेंद्र फडणवीस यांना दिवसरात्र राहुल गांधीच दिसत आहेत, त्याच भितीपोटी ते दररोज राहुल गांधी यांच्यावर टीका करत असतात. खरे लायर तर दिल्लीत बसले असून महाराष्ट्रात थीफ मिनिस्टर बसले आहेत, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश […]

अधिक वाचा..

मुंबईत खड्डेमय उड्डाणपुलांविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

मुंबई: सोमवार (दि. 25) ऑगस्ट मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून दररोज लाखो नागरिक येथे प्रवास करतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील बहुतांश उड्डाणपूल व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. हे उड्डाणपूल महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ (एम.एस.आर.डी.सी.) च्या अखत्यारीत येतात. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून वाहतुकीची भीषण कोंडी निर्माण होते. यामुळे दररोज […]

अधिक वाचा..

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार गणेशोत्सवापूर्वी होणार;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 

मुंबई: राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्याप्रमाणे एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचा वेतन गणपती उत्सवापूर्वी देणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार हा महिन्याच्या ७ तारखेपासून १० तारखेच्या दरम्यान होत असतो. परंतु यंदा गणपती उत्सव हा ऑगस्ट महिन्याच्या […]

अधिक वाचा..

पैश्यासाठी खून! शिरूर पोलिसांची केली काही तासात गुन्ह्याची उकल, दोघे आरोपी जेरबंद

शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथे उसने घेतलेले पैसे मागितले म्हणूण आरोपींनी उसाच्या शेतात खून करून मृतदेह लपविल्याची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या चार दिवसांत शिरूर पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. फाकटे (ता. शिरूर) येथील देवराम नानाभाऊ टेके (वय ५०) यांच्या खुनाचा तपास काही तासांत वेगाने उलगडत आरोपींपर्यंत पोहोचत पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलीस स्टेशनचे मिलिंद देवरे यांची सुजाण कारवाई;  हरवलेली बालिका सुखरूप पालकांच्या ताब्यात

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): सामाजिक जबाबदारी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी सज्ज असलेल्या पोलीस दलाचा संवेदनशील चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. शनिवारी 1 वाजल्याच्या दरम्यान शिक्रापूर येथील चाकण चौकात हरवलेली तब्बसून झहीर खान ही केवळ ५ वर्षीय चिमुरडी सुखरूपपणे तिच्या पालकांच्या ताब्यात परत आली असुन. देवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 वाजलेच्या दरम्यान चाकण चौक परिसरात रडत असलेल्या […]

अधिक वाचा..

महसूल सप्ताह मलठण येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न

पाबळ (सुनिल जिते): महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवस कृती आराखड्यानुसार व महसूल विभागाच्या आदेशानुसार “महसूल सप्ताह २०२५” अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन दि. २५/०८/२०२५ रोजी मंडल मलठण, (ता. शिरूर), येथे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले. या शिबिरात “जिवंत सातबारा” मोहिमेंतर्गत खातेदारांच्या वारस नोंदी करून दुरुस्ती सातबारा व फेरफार तयार करण्यात आले. […]

अधिक वाचा..

अन्नापुर येथे महावितरणकडून नवीन फ्यूज पेट्या बसविण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून समाधान

सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश शिरूर (अरुणकुमार मोटे): अन्नापुर (ता. शिरूर) येथे दीर्घकाळ प्रलंबित असलेला व शेतकऱ्यांच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रश्न अखेर सुटला आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर महावितरण प्रशासनाने दखल घेतली व गावातील कृषी रोहित्रांवरील धोकादायक व जीर्ण झालेल्या फ्यूज पेट्या बदलून नवीन पेट्या बसवल्या आहेत […]

अधिक वाचा..