शिरुर बायपासवर बेकायदेशीर रस्ता दुभाजक तोडल्याने चार वाहनांच्या विचित्र अपघातात दोघांचा बळी…

शिरुर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील शिरुर बायपास येथे संग्राम हॉटेलसमोर मंगळवार (दि ११) झालेल्या चार वाहनांच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर शिरुर बायपासवरील रस्ता दुभाजकाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संग्राम हॉटेलसमोर रस्ता दुभाजक बेकायदेशीरपणे तोडून तयार करण्यात आलेल्या मार्गामुळेच वाहनचालकांना धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप संतप्त नागरिक व वाहनचालकांकडून […]

अधिक वाचा..

आयुर्वेदिक औषध कंपन्यांवर FDAचा हातोडा; 10 संस्थांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

मुंबई : राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांच्या मनमानी कारभाराविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 तसेच त्याअंतर्गत ‘शेड्युल टी’मधील गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस (GMP) नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या 10 आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानंतर राज्यभरातील 434 […]

अधिक वाचा..

स्वाभिमानीच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर १२ ठराव; कर्जमाफीसह शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाच्या दोन दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठकीत शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर १२ महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आले. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान, थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमजूर कल्याण महामंडळाची स्थापना, हळदीला वायदेबाजारातून वगळणे तसेच शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी या ठरावांद्वारे करण्यात आली. पुण्यातील किवळे […]

अधिक वाचा..

भीमा नदीत वाहून गेलेल्या साहेबराव मुळीक यांचा तीन दिवसांनी मृतदेह सापडला

शिरूर : भीमा नदीपात्रात टाकलेली मोटार काढण्यासाठी गेलेल्या दहिवडी (ता. शिरूर) येथील साहेबराव बबन मुळीक (वय ५१) हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी घडली होती. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शोधमोहीमेला अखेर ११ ऑगस्ट रोजी यश आले. रांजणगाव सांडस परिसरात नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी […]

अधिक वाचा..

सोलापूर-पुणे महामार्गावरील अतिक्रमणांवर आता कारवाईचा बडगा

सोलापूर : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची (NHAI) यंत्रणा अलर्ट झाली असून, महामार्गालगतच्या ढाबे, हॉटेल्स, खानावळी आणि इतर व्यावसायिक बांधकामांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. चालू वर्षात सोलापूर-पुणे महामार्गावर तब्बल 762 अपघात झाले असून, यामध्ये 426 जणांचा मृत्यू झाला आहे. […]

अधिक वाचा..

संजय राऊत अन् नरेश म्हस्के आमनेसामने; ‘अरे ये ना… यावंच लागणार आहे ना!’ म्हणत राऊतांचा टोला

धनुष्यबाणाच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर ठाकरे-शिंदे गटात खडाजंगी; नेमकं काय घडलं? नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाच्या दाव्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीनंतर मंगळवारी न्यायालयाबाहेर ठाकरे आणि शिंदे गटातील नेते आमनेसामने आले. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. या प्रसंगाचा व्हिडिओ […]

अधिक वाचा..

पुणे मार्केट यार्डात डाळिंबाची विक्रमी आवक; १०० टन माल दाखल

पुणे : डाळिंबाचा हंगाम सुरू होताच पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळबाजारात डाळिंबाची विक्रमी आवक झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यांतून तब्बल १०० टन डाळिंब बाजारात दाखल झाले. आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने डाळिंबाच्या घाऊक दरात घट झाली आहे. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार डाळिंबाला ३० ते ५० रुपये […]

अधिक वाचा..

टाटा समूहात मोठा उलटफेर! एन. चंद्रशेखरन यांचा राजीनामा; फेब्रुवारी 2027 नंतर नव्या नेतृत्वाची तयारी

मुंबई : टाटा समूहाबाबत आज मोठी बातमी समोर आली आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी अध्यक्षपदावरून राजीनामा दिला असून, त्यांचा सध्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ते पुनर्नियुक्तीसाठी अर्ज करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचा विद्यमान कार्यकाळ फेब्रुवारी 2027 मध्ये संपणार आहे. चंद्रशेखरन यांनी 12 ऑगस्ट रोजी टाटा सन्सच्या संचालक मंडळाला आपल्या निर्णयाची माहिती दिली. 18 […]

अधिक वाचा..

12 ऑगस्टला वर्षातील खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार नाही, लाईव्ह स्ट्रीमिंगचा पर्याय

मुंबई : आकाशप्रेमींसाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे. 12 ऑगस्ट 2026 रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार असून, या वेळी चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकणार आहे. त्यामुळे ग्रहणाच्या पट्ट्यात काही काळ दिवसाच्या वेळी अंधाराचे वातावरण निर्माण होणार आहे. या अद्भुत खगोलीय घटनेबाबत जगभरातील खगोलप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता आहे. या सूर्यग्रहणाचा खग्रास पट्टा ग्रीनलँड, आइसलँड, उत्तर रशिया, उत्तर स्पेन आणि […]

अधिक वाचा..

तिरंग्याच्या प्रेमामागे भाजपा-आरएसएसचा कावा नसावा’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनेक वर्षे तिरंगा ध्वजाला विरोध केला, स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग नव्हता आणि स्वातंत्र्यानंतरही दीर्घकाळ संघाच्या कार्यालयावर तिरंगा फडकवण्यात आला नाही, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. आज आरएसएसला तिरंग्याबद्दल प्रेम वाटत असेल तर त्याचे स्वागतच आहे; ‘देर आये, दुरुस्त आये’, मात्र यामागे भाजपा आणि आरएसएसचा काही कावा नसावा, असा […]

अधिक वाचा..