बदर समितीचा अहवाल जाहीर केल्याशिवाय उपवर्गीकरणाचे विधेयक आणू नका; विजय वडेट्टीवार

मुंबई: अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर मुंबईत निघालेल्या मोठ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली. अहवाल जाहीर करून सर्व संबंधित घटकांशी व्यापक चर्चा केल्याशिवाय उपवर्गीकरणासंदर्भातील कोणतेही विधेयक आणू नये, असे त्यांनी विधानसभेत स्पष्ट केले. वडेट्टीवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे अनुसूचित जातीतील शोषित, […]

अधिक वाचा..

मोठ्या पगाराचे आमिष दाखवून तरुणांची आंतरराष्ट्रीय तस्करी, सुटकेसाठी धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून महाराष्ट्रासह देशातील शेकडो तरुणांची आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी करून त्यांना म्यानमार-थायलंड सीमेवरील छळछावण्यांमध्ये डांबून जबरदस्तीने सायबर गुन्हे करण्यास भाग पाडले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेऊन संबंधित तरुणांच्या तातडीच्या सुटकेसाठी […]

अधिक वाचा..

डीपीआरपूर्वी मंजुरीमुळे कुंभमेळ्याची विकासकामे रखडली; नाशिकच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न विधानपरिषदेत

मुंबई: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या विविध विकासकामांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार होण्यापूर्वीच प्रशासकीय मंजुरी देण्यात आल्यामुळे अनेक प्रकल्प रखडले असून त्याचा फटका नाशिककरांना बसत असल्याचा मुद्दा आमदार सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. तांबे यांनी शासनाने कुंभमेळ्याची कामे वेळेत सुरू करण्याचा प्रयत्न केल्याचे स्वागत करताना, डीपीआरपूर्वी मंजुरी दिल्यामुळे भूसंपादन पूर्ण न झाल्याने अनेक रस्ते […]

अधिक वाचा..

नगरविकास विभागात भ्रष्टाचाराचा सुळसुळाट; टीडीआर घोटाळे, स्मार्ट सिटी अपयशाची एसआयटी चौकशी करा; विजय वडेट्टीवार

मुंबई: नगरविकास विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत नगरविकास विभागातील कथित भ्रष्टाचार, टीडीआर घोटाळे, स्मार्ट सिटी योजनेतील अपयश आणि निधीच्या गैरव्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. वडेट्टीवार म्हणाले की, नगरविकास विभागाच्या मूळ अर्थसंकल्पात ६५ हजार कोटी रुपयांची तरतूद असताना केवळ तीन महिन्यांत त्यापैकी अवघा २० टक्के […]

अधिक वाचा..

ओबीसी विचार देशभर पोहोचवण्याची गरज; राहुल गांधींच्या सामाजिक न्यायाच्या लढ्याला बळ द्या; हर्षवर्धन सपकाळ

महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्त टिळक भवनात ‘सत्यशोधक चळवळ’ परिसंवाद व प्रज्ञावंतांचा सत्कार मुंबई: महाराष्ट्राने देशाला ओबीसी विचार दिला असून, शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचा समतावादी विचार आणि वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान हे ओबीसी चळवळीचे मूलभूत आधार आहेत. जातीपलीकडे जाऊन माणसाला केंद्रस्थानी ठेवणारा महाराष्ट्राचा हा विचार आता देशभर पोहोचवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन […]

अधिक वाचा..

टीईटी पेपरफुटी प्रकरणी काँग्रेसचे सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन

मुंबई: टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून युवक काँग्रेसने राज्य सरकारविरोधातील आंदोलन अधिक तीव्र केले असून सलग तिसऱ्या दिवशी विधानभवन परिसरात जोरदार निदर्शने केली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रविवारी होणाऱ्या टीईटी परीक्षेचा प्रश्नपत्रिका शनिवारी ठाण्यात फुटल्याने […]

अधिक वाचा..

विजया मेहता यांच्या निधनाने मराठी रंगभूमीची अपूरणीय हानी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

मुंबई: मराठी रंगभूमीच्या ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका, अभिनेत्री आणि प्रायोगिक रंगभूमीच्या अग्रणी विजया मेहता यांच्या निधनाने मराठी तसेच भारतीय रंगभूमीने एक मनस्वी कलावंत गमावला असून, त्यांच्या जाण्याने एका समृद्ध सांस्कृतिक पर्वाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सुनेत्रा पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, विजया मेहता यांनी आपल्या विलक्षण […]

अधिक वाचा..

संघर्षातून नेतृत्वापर्यंत! एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

सामान्य कार्यकर्त्यापासून राज्याच्या नेतृत्वापर्यंतचा प्रवास, संघटनशक्ती, निर्णयक्षमता आणि विकासाभिमुख कार्यशैलीची चर्चा मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे हे गेल्या काही वर्षांत सर्वाधिक चर्चेत राहिलेले नेते ठरले आहेत. सामान्य कार्यकर्त्यापासून राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंतचा त्यांचा प्रवास हा संघर्ष, संघटनशक्ती, निर्णयक्षमता आणि जनसंपर्क यांच्या जोरावर घडल्याचे त्यांच्या समर्थकांचे मत आहे. तर त्यांच्या काही राजकीय निर्णयांवर विरोधकांकडून सातत्याने […]

अधिक वाचा..

भाऊचा धक्का? सचिन अहिरांच्या निर्णयाने मुंबईच्या राजकारणात नवी चर्चा

मुंबई: राजकारणात काही निर्णय हे केवळ पक्षबदल नसतात; ते नेतृत्वावरील विश्वास, संघटनशक्ती आणि भविष्यातील राजकीय दिशेचे संकेत मानले जातात. आमदार सचिन अहिर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर लगेचच विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा आणि नामांकन निश्चित झाल्याने मुंबईच्या राजकीय वर्तुळात या घडामोडीची […]

अधिक वाचा..

चेंबूर बस दुर्घटनेची शिंदेंकडून गंभीर दखल; जखमी विद्यार्थ्यांच्या उपचारांच्या सूचना

मुंबई: चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून काही विद्यार्थी जखमी झाल्याच्या घटनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने आणि योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. शिंदे यांनी सांगितले की, त्यांनी राहुल शेवाळे आणि आमदार काते यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून दोघेही घटनास्थळी उपस्थित आहेत. जखमी […]

अधिक वाचा..