शिरुर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी प्रितम पाटील

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुरनगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी प्रीतम पाटील यांची वर्णी लागली आहे. प्रितम पाटील हे २०१७ ला एमपीएससी (MPSC) परीक्षा पास करत प्रथम ठाणे महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त व भिवंडी महानगरपालिका येथे ही सहाय्यक आयुक्त म्हणून काम पाहत होते. काही दिवसांपुर्वी शिरुरनगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदावर प्रितम पाटील यांची मुख्याधिकारी म्हणून […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दरोड्यातील दोन वर्षे फरार असणाऱ्या आरोपीला केली अटक

शिरुर (तेजस फडके) दोन वर्षांपुर्वी कोंबड्या घेवुन जाणाऱ्या टेम्पोवर आठ जणांनी दरोडा टाकत दरोडयामधुन मिळालेल्या कोंबडयापैकी १२४० कोंबड्यांची विक्री करुन सदर विक्रीतुन आलेली रक्कम आरोपीनी वाटुन घेतली होती. तसेच हा गुन्हा घडल्यापासुन आरोपी प्रदिप उर्फ प्रदयुमन हरीश्चंद्र शिंदे (रा. करंजेनगर, शिकापुर ता. शिरुर, जि.पुणे) हा फरार होता. त्याचा शोध घेत असताना शिरुर पोलीस ठाण्याच्या गुन्हे […]

अधिक वाचा..

शिरुर; ग्रामीण भागातील हजारो निराधार महिलांचा आधार ठरतंय बंधन आणि ITC मिशन सुनहरा कल

कान्हूर मेसाई (सुनील जिते) ग्रामीण भागातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ITC मिशन सुनहरा कल अंतर्गत ‘बंधन संस्था’ निराधार महिलांना आधार देण्यासाठी पुढे आली असुन काही महिलांच्या घरातील एक वेळेची चुल पेटत नाही अशा महिलांना छोटे छोटे व्यवसाय जसे की कपडे, किराणा किट, चप्पल जुते, बांगडी, भाजी पाल्याची गाडी, कॉस्मिटिक सामान इत्यादी सामानाचे वाटप करण्यात […]

अधिक वाचा..

घोड धरणातुन बेकायदेशीर वाळु उपसा सुरुच; प्रशासन हतबल…?

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील लाखो हेक्टर शेतीला वरदान ठरलेल्या घोड धरणातुन महसुल विभागाच्या नाकावर टिच्चून वाळूमाफिया बेसुमार वाळू उपसा करत असुन हे वाळू माफिया प्रशासनालाही जुमानत नसल्याने महसूल व पोलिस प्रशासन अक्षरशः हतबल झाल्याचे चित्र शिरुर तालुक्यात पहायला मिळत आहे. सध्या विधानसभा तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर निवडणुका जवळ आल्याने […]

अधिक वाचा..
kondhapuri-school

कोंढापूरी येथील विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेंमध्ये यश!

शिक्रापूरः कोंढापूरी (ता. शिरूर) येथील जय मल्हार गणेश तरुण मंडळातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक वर्गातील प्रथम तीन क्रमांकास बक्षीस वितरण करण्यात आले. रामदास गायकवाड, राहूल दिघे, चंद्रकांत दिघे, नानासाहेब गायकवाड, संतोष वीर, मधुकर गायकवाड, योगेश गायकवाड, सुनिल गायकवाड, रमेश गायकवाड, भगवान गायकवाड या सर्व तरुण मंडळाचे शाळेचे वतीने मुख्याध्यापक सुदाम लंघे […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

बापरे! शिरूर तालुक्यात एकाच रात्रीत चोरटयांनी केली १३ विद्युतपंपांची चोरी…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील नागरगाव येथील भीमा नदीच्या बंधाऱ्याजवळील शेतकऱ्यांचे तब्बल १३ विद्युत पंप चोरट्यांनी एकाच रात्रीत लांबविले आहेत. शिरूर तालुक्यात गेले अनेक महिन्यापासून विद्युत रोहित्र, विद्युत पंप व केबल चोरून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. या चोरट्यांचा पोलिसांनी त्वरित छडा लावावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. […]

अधिक वाचा..

शिरूर! तक्रार मागे घे, नाहीतर पुन्हा जिवंत सोडणार नाही…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे जुन्या तक्रारीचा राग मनात धरून व ‘तुम्ही आमच्याविरूद्ध केलेली केसेस माघारी घे, नाहीतर पुन्हा तुम्हाला जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी दिली. शिवाय, मारहाण केल्याची घटना घडली असून, शिरूर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथील जमीन गट नंबर १०५ मधील खाजगी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुका डॉट कॉम व रामलिंग महिला उन्नती च्या घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आपल्याकडे गौरी, गणपती, नवरात्री हे उत्सव अशा विविध प्रकारचे धार्मिक उत्सव साजरे केले जातात. त्यात पुर्वी अनेकवेळा प्लास्टिक, थर्माकॉल आणि इतर वस्तु आपण सजावटीला वापरायचो. परंतु सध्या पर्यावरणपुरक उत्सव साजरा करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. आता आपण शाडूच्या मातीपासुन गणपती किंवा पर्यावरणपुरक विघटित होणारा कचरा यापासुन सजावट करण्याकडे सध्या लोकांचा कल वाढला […]

अधिक वाचा..
waghale-sugarcane

वाघाळे येथे वादळी पावसाने ऊस, मका भुईसपाट…

वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) येथे सोमवारी (ता. २३) सायंकाळी सहाचे सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने ऊस, मका, कडवळ ही पिके अक्षरशः भुईसपाट झाली आहेत. वाघाळे आणि परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. सततच्या पावसाने कांद्याची रोपे खराब झाली होती. उरलेल्या रोपत शेतकऱ्यांनी कशीबशी कांदा लागवड केली होती. पण रात्री पावसाचा जोर इतका होता की […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांची पहिले जनसुनवाई मगच कारवाई…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशनचा पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी चार्ज घेताच शिरूर शहरातील रोड रोमिओ व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिस वाहतुक शाखेमार्फत वीस दिवसातच तब्बल ४ लाख ५१ हजारांचा दंड वसुल केला आहे. यात १७ बुलेटस्वारांवर सायलेन्सर (फटाके फोडणे) कारवाई केली असून १७ हजार रूपयांचा दंड वसुल केला आहे. […]

अधिक वाचा..