bhandara-gram-panchayat

ग्रामपंचायतीमधील सरपंचाच्या टेबलवर बसूनच प्यायला दारू…

भंडारा : भंडाऱ्यातील ग्राम सुरक्षा दलाची जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायतच्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याने थेट ग्रामपंचायत सरपंच आणि सचिवाच्या टेबलवरचं बसून मद्यप्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाखनी तालुक्यातील केसलवाडा वाघ या ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार घडला असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रशांत मन्साराम शेंडे (वय 25) असे मद्यप्राशन करीत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नाव आहे. […]

अधिक वाचा..
leopard

तळेगाव ढमढेरे जगतापवस्ती येथे बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला…

शिक्रापूर (योगेश शेंडगे): शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, निमगाव म्हाळुंगी, पारोडी, दहिवडी, इंगळे नगर या गावांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर लक्षणीय वाढला आहे. बिबट्याने छोटे-मोठे हल्ले करून अनेक प्राण्यांवर हल्ला करून त्यांना जेरबंद केले आहे. या घटना ताज्या असतानाच तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीतील जगतापवस्ती येथे बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना बुधवारी (ता. ७) रात्री […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरूर तालुक्यात चहाच्या दुकानात मिळत होती चक्क दारू…

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील एका चहाच्या दुकानातून होणाऱ्या दारूविक्रीवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत दारूसाठा जप्त केला आहे. पोलिस शिपाई उमेश देविदास जायपत्रे (वय ३२, रा.शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पूणे) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी संतोष गुलाबराव गायकवाड (वय ४७, रा. कोंढापुरी, ता. शिरुर, जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. […]

अधिक वाचा..
Shirur Robbery

शिरूर तालुक्यात मध्यरात्रीच्या सुमारास दरवाजा राहिला अर्धवट उघडा अन्…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथील सुभाष भिकोबा कदम या व्यक्तीला रात्रीच्या वेळी दरवाजा अर्धवट उघडा ठेवणे चांगलेच महागात पडले आहे. चोरटयाने घरात प्रवेश करून घरामध्ये देव्हाऱ्याच्या खाली असलेल्या लाकडी कप्यात ठेवलेले साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे १ लाख ,७८ हजार रूपये किमंतीचे दागिने चोरुन नेले आहे. शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष भिकोबा […]

अधिक वाचा..
Natyachata-2024

नाट्यछटेला पुणे जिल्ह्यातून 2100 मुलांनी नोंदवला उस्फुर्तपणे सहभाग!

पुणे : बालरंग भूमी परिषद पुणे जिल्हा व निळू फुले अकादमी आयोजित नट श्रेष्ठ अविनाश देशमुख नाट्यछटेला पुणे जिल्ह्यातून 2100 मुलांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला. शिक्षक भवन नवी पेठ, पुणे या ठिकाणी नाट्यछटा स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी (ता. १०) संपन्न झाली त्यानंतर बक्षीस वितरणाचा सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनेत्री व अध्यक्ष बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईच्या […]

अधिक वाचा..
karale

कारले जरूर खा; पाहा आरोग्यासाठी किती फायदे…

कारले चवीला कडू असल्यामुळे अनेकांना ते नकोसे वाटते. पण, या कारल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, जे समजल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारल्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर देखील असतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारलं हे खूप फायदेशीर आहे, याच्या सेवनाने पचनक्रियाही सुधारते. वजन कमी करणे आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. कारल्याचे काही आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया… मधुमेहाच्या […]

अधिक वाचा..
kalagitura

लोणी मध्ये नागपंचमीच्या दिवशी कलगीतुरा कार्यक्रम संपन्न!

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव जि. पुणे) येथे शुक्रवारी (ता. ९) रोजी नागपंचमी निमित्त शाहीर नानासाहेब साळुंखे श्रीगोंदा कलगीवाले व शाहीर रामदास गुंड पारनेर तुरेवाले यांचा भव्य कलगीतुरा सामन्याचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन लोणी येथे पार पडला. कलगीतुरा या कार्यक्रमाची सुरुवात सन १९९३ मध्ये झाली. आंबेगाव, जुन्नर, शिरूर, खेड,पारनेर, हवेली, पुणे आदी […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील महिलेवर आली आत्महत्येची वेळ; कारण…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील महिलेवर आत्महत्येची वेळ आली आहे. सबंधित शिरूर तालुका.कॉम’ ने उजेडात आणल्यानंतर या अन्यायाविरोधात लढण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या महिलेला पाठींबा दिला आहे. शिरुर शहरातील मध्यवर्ती जागा ठेकेदारांच्या माध्यमातून बी. ओ. टी. वर घ्यायच्या आणि व्यापारी गाळे बांधुन पैसे कमवायचे असा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षापासून शिरूर शहरात ठिकठिकाणी चालू आहे. परंतु, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अजुनही पोर्शे पॅटर्न जोरात, पोलिसांचे दुर्लक्ष; कडक उपाययोजना करण्याची गरज

शिरुर (तेजस फडके) पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा झाली. एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारुच्या नशेत वेगाने आलिशान पोर्शे कार चालवून दोघांना उडवल्याने दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने चारचाकी पिक चालवित एक जणाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.   शुक्रवार (दि […]

अधिक वाचा..

मांडवगण फराटा येथे टेम्पो व दुचाकीच्या धडकेत पंधरा वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू…

मांडवगण फराटा (संपत कारकुड) शिरुर तालुक्याच्या पुर्वभागातील मांडवगण फराटा गावापासुन दिड किमी अंतरावर असलेल्या कोळपेवस्ती येथे मालवाहतूक करणारा टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत नववीत शिकणाऱ्या श्रावणी देविदास थोरात (वय १५) हिचा जागीच मृत्यू झाला आहे. आज (दि ९) रोजी शाळा सुटल्यानंतर ४:३० ते ४:४५ दरम्यान घरी जाताना भरधाव टेंपोने या शाळकरी मुलीचा बळी घेतला आहे. तिच्या […]

अधिक वाचा..