शिरूर तालुक्यातील महिलेवर आली आत्महत्येची वेळ; कारण…

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील महिलेवर आत्महत्येची वेळ आली आहे. सबंधित शिरूर तालुका.कॉम’ ने उजेडात आणल्यानंतर या अन्यायाविरोधात लढण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या महिलेला पाठींबा दिला आहे.

शिरुर शहरातील मध्यवर्ती जागा ठेकेदारांच्या माध्यमातून बी. ओ. टी. वर घ्यायच्या आणि व्यापारी गाळे बांधुन पैसे कमवायचे असा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षापासून शिरूर शहरात ठिकठिकाणी चालू आहे. परंतु, ठेकेदारावर कुठलेही नियंत्रण ठेवले जात नाही. यामुळे ठेकेदाराला वेळोवेळी पैसे देवूनही गाळा न दिल्याने शिरूरच्या सिमा गिरमकर या महिलेवर कुटुबांसह आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

शिरूर पंचायत समिती बी. ओ. टी. प्रकल्पात बांधलेल्या गाळ्यात एक गाळा घेण्यासाठी सिमा राहुल गिरमकर या हातावर पोट भरणाऱ्या महिलेने १० लाख रुपये संबधित ठेकेदाराला २०१५ पासून दिले असताना ऑगस्ट २०२४ पर्यंत त्यांना गाळा दिला जात नाही. अजुन जास्त पैशाची मागणी केली जाते. इतर गाळे ११ लाखापर्यंत दिले असताना या गरीब महीलेच्या गरीबीचा गैरफायदा घेऊन ठेकेदार १० वर्षे त्यांना वेठीस धरले आहे.

दरम्यान, तहसीलदार तथा तालुका न्यायदंडाधिकारी शिरुर, गट विकास अधिकारी पंचायत समिती शिरुर, पोलिस निरीक्षक शिरुर यांनी तातडीने पुढाकार घेऊन या महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

शिरुर येथील बहुचर्चित बीओटी प्रकल्पातील ठेकेदाराकडुन महीलेची फसवणुक; मुख्यमंत्र्याकडे केली तक्रार

शिरुर तालुक्यात अजुनही पोर्शे पॅटर्न जोरात, पोलिसांचे दुर्लक्ष; कडक उपाययोजना करण्याची गरज

मांडवगण फराटा येथे टेम्पो व दुचाकीच्या धडकेत पंधरा वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू…

शिरुर; सासऱ्याचा सुनेबरोबर झाला वाद अन सुनेच्या दोन भावांनी व बहिणीने सासर्‍याला केले ठार…

पाबळ व मलठण येथील मंडल अधिकारी यांच्या तक्रारी वाढल्या; तहसीलदार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष