पुण्यात दोन वेगवेगळ्या दुर्घटना; चिमुकलीचा मृत्यू, तर मद्यधुंद कारचालकाच्या अपघातात दोघांचा बळी

पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्या घटनेत मद्यधुंद कारचालकाच्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मगरपट्ट्यात घसरगुंडी कोसळून चिमुकलीचा मृत्यू हडपसरमधील मगरपट्टा परिसरात सोसायटीच्या आवारात बसविण्यात आलेली लोखंडी घसरगुंडी डोक्यावर पडून साडेचार वर्षांच्या अनिका नवनाथ देवीकर हिचा मृत्यू झाला. […]

अधिक वाचा..
sandeep-gill

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे थेट ‘घरपोच नशा’ पोहोचवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरुर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ‘एमडी’ अंमली पदार्थाचा मोठा साठा उघडकीस आला असुन ‘पोर्टर’ या डिलिव्हरी अ‍ॅपच्या माध्यमातून हा माल पुरवला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…

शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन सुरू होते. या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल हे शिरूर मध्ये आले होते. त्यांना अवैध धंद्यांची माहिती कळतात त्यांनी कठोर भूमिका घेत शिरूर पोलीस ठाणे, रांजणगाव पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांना शिरूर पोलीस ठाणे […]

अधिक वाचा..

वाघोलीत घडली हृदयद्रावक घटना; उच्चशिक्षित महिलेने संपवलं आयुष्य…

वाघोली : वाघोलीतील ‘रविनंदा कॉयलाईट’ सोसायटीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. माहेरहून १० लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी केलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून रचयिता अभिषेक गुप्ता (वय ३७) या उच्चशिक्षित विवाहितेने १६ एप्रिल रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रचयिता या व्यवसायाने संगणक अभियंता होत्या. मात्र, गेल्या काही काळापासून सासरच्या मंडळींकडून त्यांच्याकडे […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात अनधिकृत दत्तक प्रकरण उघड; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात अनधिकृत पद्धतीने बालिकेला दत्तक दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ चे उल्लंघन केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बाल संरक्षण अधिकारी शत्रुघ्न रूस्तूम खोकले (वय ३१, रा. आळंदी, पुणे) यांनी फिर्याद […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर पोलिस ठाण्यासमोरच दोन गटात दगडफेक, हाणामारी, ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर पोलिस ठाण्याच्या आवारातच सोमवारी (ता. १३) मध्यरात्री गोंधळ, दगडफेक आणि मारामारीची घटना घडल्यामुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिस स्टेशनच्या आवारातच दोन गट आमनेसामने येत एकमेकांवर हल्ले करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, यामुळे कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच ठाणे अमंलदार कक्षातीत काही वस्तुंची तोडफोड झाल्याची माहीती […]

अधिक वाचा..
crime

शिरूर तालुक्यातील पोलिस चौकीजवळ काय सुरू आहे? हे पोलिसांना माहितच नव्हतं; अखेर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर मटका अड्डा सुरू होता. पण, पोलिसांना याबद्दल काहीच माहित नव्हते. अखेर पोलिस चौकीजवळ असलेल्या या मटका अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (LCB) छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. कोरेगाव भीमा येथील वढू रस्त्यालगत असलेल्या खुशबू पान शॉपसमोर, एका हॉटेलच्या शेडमध्ये ‘कल्याण’ नावाचा मटका बेधडकपणे […]

अधिक वाचा..
sanjay-travel-bus-fire

शिरूर! पुणे-नगरमहामार्गावर कारला धक्का लागल्याने कंटेनरच पेटवला…

शिरूर : पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर येथील ‘जीत ढाब्या’समोर कारला कंटेनरचा धक्का लागल्याच्या रागातून कारमधील दोघांनी कंटेनर चालकाला बेदम मारहाण करत दोघांनी मालाने भरलेला कंटेनर पेटवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोन अज्ञात कार चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कंटेनर चालक अंकुश मस्तराम शर्मा (वय ३३, रा. जम्मू-काश्मीर) हे ३ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास अहिल्यानगरकडून […]

अधिक वाचा..
shirur-firing

Video! शिरूर तालुक्यातील सविंदणे गावात हवेत गोळीबार; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील सविंदणे गावात रात्रीच्या सुमारास हवेत गोळीबार केल्या प्रकरणी पोलिसांनी एका सेवानिवृत्त सैनिकासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. 5 एप्रिल 2026 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास राजेश लंघे यांच्या घरासमोर ही गोळीबाराची घटना घडली आहे. मुंबईहून आपल्या मूळ गावी आलेल्या या मंडळींनी कायद्याचे उल्लंघन केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले […]

अधिक वाचा..

पुण्यात १६ वर्षीय मुलीचा बालविवाह; नातेवाईकांवर गुन्हा दाखल

पुणे : बिबवेवाडी परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुधीर ढाकणे तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली […]

अधिक वाचा..