Shikrapur Police Station

शिरूर तालुक्यात अनैतिक संबंधातून बालकांचे अपहरण; चिमुकलीला फेकले विहिरीत…

शिरूर: शिरूर तालुक्यातील वाडागाव येथील तीन लहान चिमुकल्यांचे एका युवकाने अपहरण करुन एका चिमुकलीला विहिरीमध्ये फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिसांनी दोन बालकांची सुटका करत आरोपीला अटक केली आहे. गायत्री रणजीत कुमार रविदास (वय ७ रा. वाडागाव ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. झारखंड) असे खून केलेल्या चिमुकलीचे नाव असून, तिचा मृतदेह विहिरीतून […]

अधिक वाचा..
crime

तू गाडी थांबवली का नाहीस? या कारणावरून झाले भांडण अन् पुढे…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पोंदेवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे दुपारच्या वेळेस मोटार गाडी मागे घेण्याच्या कारणावरून मारहाण व शिवीगाळ प्रकरणी दोन्ही बाजूने फिर्याद दाखल झाली असून एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल दत्तात्रय टाव्हरे यांचा भाऊ संदीप वाळुंज याने गणेश लोले यास गाडी थांबवण्यास सांगितले होते. तर तू गाडी […]

अधिक वाचा..

सोमनाथ सुर्यवंशींची हत्या करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करुन गुन्हे दाखल करा…

सरपंच हत्येतील गुन्हेगारांवरही कठोर कारवाई करा मुंबई: परभणी व बीड प्रकरणी पोलिसांच्या मदतीने लोकांचे जीव घेतले गेले. परभणीतील आंबेडकरी अनुयायी सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या पोलिसांच्या मारहणीमुळेच झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. सरकारने अजून त्या पोलिसांवर कठोर कारवाई केलेली नाही. संविधानाच्या विटंबनेनंतर परभणीत कोंबिंग ऑपरेशन करून निरपराध लोकांना बेदम मारहाण करण्यात आली. या कोंबिंग ऑपरेशनचे आदेश कोणी […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील सराईत गुन्हेगाराकडून तब्बल ११ मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस

6 लाख ६० हजारांच्या गाडया जप्त  शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी वाहने चोरून धुमाकूळ घालणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अटक केली असून त्याच्याकडून मोटर सायकल चोरीचे तब्बल ११ गुन्हे उघडीस आणून ६ लाख ६० हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. संतोष उर्फ शरद गजानन इंगोले (रा.पांगरी कुटे, ता.मालेगाव, जि.वाशिम […]

अधिक वाचा..
ashok-bhorde

शिरूर तालुक्यातील RTI कार्यकर्त्याचा हत्येचा कट उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे उधळला…

शिक्रापूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील RTI /व्हिसल ब्लोअर कार्यकर्ते यांच्या घराची रेकी करत त्यांच्या गाडीचा पाठलाग करत हत्येचा कट रचल्या प्रकरणी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे तीन जणांविरुद्ध अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम २०१६ तसेच इतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्यात वापरलेली बलेनो कार क्रं एम एच १२ एक्स ई ५१०९ शिक्रापुर पोलिसांनी ताब्यात घेतली […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात ज्येष्ठ नागरिकाला पुतण्याकडून बेदम मारहाण…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील अण्णापूर येथील एका ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला त्यांचे घर नावावर करुन देण्यासाठी पुतण्याकडूनच लाथा बुक्क्यानी व गजाने बेदम मारहाण करत त्यांचा हात मोडण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पुतण्यावर मारहाण व ज्येष्ठ नागरीक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम २००७ चे कलम ४ , २४ अन्वये […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व सरपंच यांना सुपारी देवून जीवे मारण्याची धमकी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील नव्याने स्थापण झालेल्या माळवाडी गावातील सरपंच व शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष यांना राजकीय वैमन्यशातून सुपारी देऊन जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे . मी सुपारी कोणाला दिली याची चौकशी करून या प्रकरणांमध्ये शिरूर पोलिसांनी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी होत आहे. नाहीतर मस्साजोग सारखे प्रकरण शिरूर तालुक्यात घडल्याशिवाय […]

अधिक वाचा..
kadba-chor

Video: शिरुर तालुक्यातील कडबा पेंढी चोर झाला सीसीटीव्हीत कैद; ओळखा कोण?…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यात सध्या ज्वारी काढणीला वेग आला असून दिवसेंदिवस मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. शेतकरीही मोठया प्रमाणात ज्वारीचे पिक घेत नसल्यामुळे कडब्याच्या किंमती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. त्यामुळे रांजणगाव परीसरात एका भामट्याने अनोखी शक्कल लढवत एका शेतकऱ्याच्या वावरातील थोड्या थोड्या करुन एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ७५ कडब्याच्या पेंढ्यांची चोरी केली आहे. […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात मिस्त्रीचे काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील काठापुर येथे एका घराचे काम करणाऱ्या सुरेश भगवान ढोकणे (वय ३९, रा. नागापूर, ता. जि. बीड) या मिस्तरीने घरातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छ्ळ करुन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी सुरेश ढोकणे याला शिरूर पोलिसांनी तत्परतेने […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये बिगरपरवाना बेकायदेशिर मांडूळ प्रजातीचा वन्यजीव बाळगणा-या दोघांना घेतले ताब्यात

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर – रामलिंग रस्त्यावर घोटी मळ्याकडे जाणाऱ्या गायरान जमिनीत थांबलेल्या स्विफ्ट कारमधून मांडूळ साप बाळगणाऱ्या दोघांना शिरूर पोलीस पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून एक मांडूळ साप जप्त करण्यात आला असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे. याप्रकरणी देवदास ईमराज भोसले (वय ५१ वर्ष )रा. मुखई, ता शिरूर […]

अधिक वाचा..