नागरिकांच्या सतर्कतेने आठवडे बाजारातील सलग सात चोरटे जेरबंद

मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार शिक्रापूर (): शिक्रापूर पोलीस ठाण्याने गेल्या दीड महिन्यापासून शिक्रापूर, कोरेगाव भीमा आणि तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये सुरू केलेल्या विशेष चोरीविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांच्या सातत्यपूर्ण गस्त, ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती आणि नागरिकांच्या सतर्क सहकार्यामुळे सलग सात चोरट्यांना रंगेहात पकडून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आठवडे बाजारातील वाढत्या […]

अधिक वाचा..

मांडवगण फराट्यात डॉ अतुल सुराणा ठरले ‘देवदूत’; बेशुद्ध रुग्णाला CPR देऊन वाचवला जीव

न्हावरे (अक्षय टेमगिरे): मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाची प्रकृती अचानक गंभीर झाल्यानंतर डॉ अतुल सुराणा यांनी प्रसंगावधान राखत तातडीने सीपीआर (CPR ) देऊन त्याचा जीव वाचवला. डॉक्टरांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे संबंधित रुग्णाची प्रकृती स्थिर करण्यात यश आले. या घटनेमुळे डॉ सुराणा यांच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत असून नागरिकांनी त्यांना ‘देवदूत’ अशी […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात महिलांनी दुकानदाराची नजर चुकवत तब्बल ८२ नग चांदीचे जोडवे लांबवल्याची घटना घडली. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) पोलिस ठाण्यात चार अज्ञात महिलांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   View this post on Instagram   A post shared by […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलिसांनी दुचाकी चोराला धाराशिवमधून केली अटक 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरातील महागणपती पार्किंगमधून चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा छडा लावत रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) पोलिसांनी आरोपीला धाराशिव जिल्ह्यातून अटक केली. त्याच्याकडुन ३० हजार रुपये किमतीची चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये विविध राज्यांतील आणि जिल्ह्यांतील मोठ्या संख्येने कामगार वास्तव्यास आहेत. त्यामुळे परिसरात दाट लोकवस्ती असून दुचाकी वाहनांचीही […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांच्या ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ पॅटर्नचे स्वागत; कठोर कारवाईमुळे गुन्हेगारांना भरली धडकी

शिरुर (तेजस फडके): गेल्या काही महिन्यांपासून शिरुर तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गोळीबार, जीवघेणे हल्ले, टोळीयुद्ध, अवैध धंदे आणि सराईत गुन्हेगारांच्या वाढत्या हालचालींमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांनी आता केवळ गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी गुन्हेगारांवर आधीच वचक निर्माण करण्यासाठी राबविलेल्या नव्या ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ पॅटर्नचे […]

अधिक वाचा..
leopard

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे. अवघ्या पाच वर्षांच्या निष्पाप चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती, संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. शिरूर तालुक्यात २०१९ पासून बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची ही १३ वी घटना आहे. या घटनेनंतर वन […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, करडे गावातील गोळीबार प्रकरणातील आरोपींना अवघ्या ७२ तासांच्या आत ताब्यात घेतल्यानंतर शिरुर पोलिसांनी वेगळाच पॅटर्न राबविला. शिरुर पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत आरोपींची शिरुर शहर आणि करडे गावातुन धिंड काढली. यावेळी पोलिसांच्या कारवाईची परिसरात मोठी चर्चा रंगली असून, ‘कायद्यात राहाल […]

अधिक वाचा..
karade-firing-case

शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…

शिरूर (तेजस फडके) : करडे (ता. शिरुर) येथे जुन्या वादातून सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राउंड फायर करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच आरोपींना शिरुर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या ७२ तासांच्या आत अहिल्यानगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. सुपा (ता. पारनेर) बसस्थानक परिसरात सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत शिरुर पोलिसांच्या डीबी पथकाने दमदार कामगिरी […]

अधिक वाचा..
pimple-jagtap-murder-case

शिरूर! पिंपळे जगताप पाझर तलावातील खुनाचा तीन दिवसांत छडा; तिघांना अटक; कारण उघड…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : पिंपळे जगताप येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात युवकाच्या खुनाचा शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत छडा लावला. तांत्रिक विश्लेषण, नातेवाईक व साक्षीदारांच्या चौकशीतून मृताची ओळख पटवत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील पाझर तलावात १७ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजण्यापूर्वी एका तरुणाचा मृतदेह आढळला. अज्ञात आरोपींनी […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

दारू प्यायची आहे…? चला किराणा दुकानात! शिरूर पोलिसांच्या हद्दीत गावठी दारूची खुलेआम विक्री…

शिरूर (तेजस फडके) : किराणा मालाच्या दुकानात सर्वसामान्यपणे धान्य, तेल, साखर, चहा, साबण आणि दैनंदिन वापराच्या वस्तू मिळतात. मात्र, शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही किराणा मालाच्या दुकानांमधून चक्क गावठी दारुची विक्री होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून पुढे येत आहेत. त्यामुळे आता “दारू प्यायची आहे…? मग दारूच्या अड्ड्यावर कशाला जाता, थेट किराणा दुकानात चला!” अशी दबक्या आवाजात […]

अधिक वाचा..