शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का…? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील करडे गावात मध्यरात्रीच्या सुमारास पिस्तुलातून थेट तीन राऊंड फायर करून एका तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न झाल्याची अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून सात जणांच्या टोळक्याने बेकायदा जमाव जमवून शिवीगाळ व दमदाटी […]

अधिक वाचा..

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृताच्या गळ्यावर खोल जखम तसेच चेहऱ्यावर दुखापतीच्या खुणा आढळून आल्याने अज्ञात व्यक्तींनी त्याचा गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तलावात फेकल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हि घटना शुक्रवारी […]

अधिक वाचा..

शिरुर! पाठीवर वडाचे झाड घेऊन पंढरपूरची पायवारी; प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात युवकाचा अनोखा एल्गार

शिरुर (तेजस फडके): एकीकडे शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून वृक्षारोपण मोहिमा राबविल्या जातात, पर्यावरण संवर्धनाचे संदेश दिले जातात आणि ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा नारा दिला जातो. मात्र, दुसरीकडे एका पर्यावरणप्रेमी युवकाने स्वतःच्या कष्टातून लावलेली हजारो झाडे वाचविण्यासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा संतापजनक प्रकार शिरुर तालुक्यात समोर आला आहे. रांजणगाव सांडस गावातील […]

अधिक वाचा..

न्हावरे येथे विवाहितेला शिवीगाळ व मारहाण; पती, सासू-सासऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल 

शिरुर (तेजस फडके): न्हावरे (ता. शिरुर) येथील शेंडगेवस्ती परिसरात एका २३ वर्षीय विवाहित महिलेला फोनवर अश्लील शिवीगाळ केल्यानंतर संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यास निघाल्याच्या कारणावरुन पती, सासू आणि सासऱ्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिरुर पोलिस ठाण्यात आत्माराम पंढरीनाथ बीडगर, सिधा संभाजी शेंडगे, संभाजी म्हस्कु शेंडगे आणि शालन संभाजी शेंडगे, (सर्व रा. न्हावरे, […]

अधिक वाचा..

वडगाव रासाई येथे पाटबंधारे विभागाचा कालवा फोडला; अनधिकृत सायपनद्वारे पाणी वळवल्याचा आरोप

सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील वडगाव रासाई येथे पाटबंधारे विभागाच्या कालव्याला अनधिकृतपणे भगदाड पाडून पाइपलाइनद्वारे सायपन पद्धतीने पाणी वळवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे सिंचनाच्या पाणीपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शासनाच्या सार्वजनिक मालमत्तेचे सुमारे १ लाख […]

अधिक वाचा..

शिंदोडीत डाळिंबाच्या बागेवर चोरट्यांचा डल्ला; ८० हजारांच्या डाळिबांची चोरी 

न्हावरे (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील शिंदोडी येथील एका शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या बागेतून अज्ञात चोरट्याने तब्बल ८०० किलो ‘सुपर भगवा’ जातीची डाळिंबे चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीला गेलेल्या डाळिंबांची अंदाजे किंमत ८० हजार रुपये असून, या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजाराम भानुदास ओव्हाळ (वय ४२, रा. शिंदोडी, […]

अधिक वाचा..
chaskaman-dam

चासकमान डाव्या कालव्यातुन ६०० क्युसेकचा विसर्ग; खाली पोहचते १८० क्युसेकने पाणी मग ४२० क्युसेक पाणी नक्की जाते कुठे…?

धरणापासून अस्तरीकरण करण्याऐवजी टेलकडून काम सुरु करण्याचा घाट; प्रशासन आणि राजकीय नेतृत्वाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह…? शिरूर (तेजस फडके) : शिरुर आणि खेड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी ठरणाऱ्या चासकमान डाव्या कालव्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, धरणातून सुमारे ६०० क्यूसेक वेगाने सोडण्यात येणाऱ्या पाण्यापैकी शिरुर तालुक्यातील मुखईपर्यंत अवघे १८० क्यूसेक पाणी पोहोचत असल्याचा गंभीर दावा कालव्याच्या […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई! अपघात टाळण्यासाठी  राष्ट्रीय महामार्गावरील २०० अनधिकृत फ्लेक्स हटवले

दुभाजकावरील जाहिरात फलकांमुळे वाहनचालकांची दृश्यमानता बाधित; नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा शिक्रापूर (ओमकार भोरडे): पुणे–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहनचालकांच्या सुरक्षेला धोका ठरणाऱ्या अनधिकृत जाहिरात फलकांवर शिक्रापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल २०० फ्लेक्स हटवले आहेत. महामार्गाच्या दुभाजकावर नियमबाह्य पद्धतीने लावण्यात आलेले हे फलक वाहनचालकांची दृश्यमानता कमी करत असल्याने गंभीर अपघाताचा धोका वाढत होता.   View this post […]

अधिक वाचा..

शासकीय कर्जाच्या आमिषाने शिरूरमध्ये १०० हून अधिक नागरिकांची लाखोंची कथित फसवणूक

महिला-बालकल्याण विभागाच्या नावाने पैसे उकळल्याचा आरोप; शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार, पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष शिरूर (अरुणकुमार मोटे): महिला व बालकल्याण विकास विभागामार्फत शासकीय कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत शिरूर परिसरातील १०० हून अधिक महिला-पुरुषांची लाखो रुपयांची कथित आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी आणि पीडितांची […]

अधिक वाचा..

शिरुर; बैलगाडा शर्यतीतील वादातून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न; बाप-लेका विरुद्ध गुन्हा दाखल; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या वादाचा राग मनात धरून सणसवाडी येथील एका २७ वर्षीय तरुणाच्या दुचाकीला भरधाव महिंद्रा थार गाडीने समोरून धडक देत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेत चेतन गणपत हरगुडे आणि त्यांचा चुलत भाऊ अथर्व नवनाथ हरगुडे हे दोघे जखमी झाले असून, त्यांच्यावर वाघोली येथील लाईफलाईन […]

अधिक वाचा..