sharad pawar dilip walse patil

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

मुख्य बातम्या राजकीय

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडण्याचे खरे कारण तीन वर्षांनी सांगितले आहे.

डिंभे ते माणिकडोह या १६ किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित बोगद्यावरून आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटलांनी आपल्या राजकीय भूमिकेचा उलगडा केला. डिंभे धरणातून निघणारा बोगदा रद्द करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता, केवळ आणि केवळ त्या एका शब्दासाठी मी साहेबांची साथ सोडली, असा थेट आणि खळबळजनक गौप्यस्फोट दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या काळात देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि माझ्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत हा वादग्रस्त बोगदा कोणत्याही परिस्थितीत होऊ दिला जाणार नाही, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. हा बोगदा रद्द व्हावा आणि शेतकऱ्यांचे पाणी वाचावे, म्हणूनच आपण शरद पवार यांच्यापासून दूर होऊन अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, असे दिलीप वळसे पाटील यांनी तीन वर्षांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात आणि मतदार संघामध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत.

राज्यातलं माझं वजन कमी झालंय: दिलीप वळसे पाटील

दिलीप वळसे पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट; निवडीविषयी म्हणाले…

Video: दिलीप वळसे पाटील यांची साथ सोडण्याचे शेखर पाचुंदकर यांनी सांगितले मुख्य कारण…

शरद पवार यांच्या टीकेनंतर दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय…

दिलीप वळसे पाटील यांना भरसभेत अश्रू अनावर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत