धक्कादायक! फीच्या पैशांसाठी विद्यार्थ्यांनीच केली मुख्याध्यापिकेची हत्या; ‘बाबू’ शब्दाने उकलले गूढ

नलगोंडा : तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात मुख्याध्यापिकेच्या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. शाळेतीलच दहावीच्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी फीची रक्कम लुटण्यासाठी मुख्याध्यापिका रुपा रेड्डी यांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी शाळेची फी जमा झाल्याची माहिती दोन्ही विद्यार्थ्यांना मिळाली होती. ही रक्कम […]

अधिक वाचा..

लाडकी बहीण योजनेला मोठा धक्का; 92 लाखांहून अधिक लाभार्थी वगळले, वसुलीबाबतही प्रश्नचिन्ह

मुंबई : महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, योजनेतील सुमारे 92.10 लाख नोंदी विविध कारणांमुळे वगळण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या […]

अधिक वाचा..

दापचरीत १,३९५ एकरांवर आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ; १० हजार रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट

पालघर : दापचरी येथे तब्बल १,३९५ एकर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाची अत्याधुनिक कृषी बाजारपेठ उभारण्यात येणार असून, या प्रकल्पातून सुमारे १० हजार रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. फ्रान्समधील रुंगीस मार्केटच्या धर्तीवर उभारण्यात येणारा हा प्रकल्प महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांना थेट जागतिक बाजारपेठेशी जोडणारा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. दापचरी येथील प्रस्तावित […]

अधिक वाचा..

खडकवासल्यात काँग्रेसचा ‘स्वबळाचा’ नारा; सतेज पाटलांनी स्पष्ट केली भूमिका

पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत आघाडी न करता आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याची मागणी केली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील स्थानिक पातळीवरील मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ […]

अधिक वाचा..

साखरेच्या दरवाढीला ब्रेक कधी? तीन दिवसांत क्विंटलमागे ५०० रुपयांची वाढ

मुंबई : ऑगस्ट महिन्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेला साखरेचा कोटा मागणीच्या तुलनेत अपुरा पडत असल्याने साखरेच्या दरवाढीचा वेग कायम आहे. गेल्या तीन दिवसांत घाऊक बाजारात साखरेच्या दरात क्विंटलमागे तब्बल ५०० रुपयांची वाढ झाली आहे. मंगळवारी एस-३० ग्रेड साखरेचा दर क्विंटलला ५,७०० रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला. किरकोळ बाजारात साखरेचा दर ५९ ते ६० रुपये किलोपर्यंत गेला […]

अधिक वाचा..

स्वारगेट-कात्रज मेट्रोच्या भुयारी कामाला वेग; सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये दोन टीबीएम दाखल

पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडीवर उपाय ठरणाऱ्या स्वारगेट ते कात्रज विस्तारित भुयारी मेट्रो मार्गाच्या कामाला आता वेग येणार आहे. या मार्गाच्या भुयारीकरणासाठी आवश्यक असलेल्या दोन अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान पुण्यात दाखल होणार आहेत. या मशीनचे असेंबलिंग पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष बोगदा खोदण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. स्वारगेट ते कात्रज हा संपूर्णपणे […]

अधिक वाचा..

चाकणमध्ये रस्त्यावर वाहने उभी केल्यास थेट जप्ती; पार्किंगसाठी एमआयडीसीच्या मोकळ्या जागांचा वापर

चाकण : चाकण औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक आणि रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंगमुळे निर्माण होणारी कोंडी दूर करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, २१ ऑगस्टपासून रस्त्यावर दुचाकीसह कोणतेही वाहन उभे केल्यास ते थेट जप्त केले जाणार आहे. वाहतूक नियमनासाठी पोलिसांना एमएसएफचे १०० जवान उपलब्ध करून देण्यात येणार असून, दोन पाळ्यांमध्ये पोलीस आणि जवान वाहतूक […]

अधिक वाचा..

खडसेंच्या अमृत महोत्सवाला फडणवीस-शरद पवार एकाच व्यासपीठावर; महाजनांच्या उपस्थितीबाबत उत्सुकता

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ३० ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका समोर आल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची विशेष उपस्थिती राहणार […]

अधिक वाचा..

अन्न भेसळीविरोधात FDAची धडक कारवाई; पुण्यात ‘चुल मटण’चा परवाना निलंबित

पुणे : अन्नपदार्थांची सुरक्षितता आणि स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा धडाका सुरू केला आहे. अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीसाठी सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत लोहेगाव येथील **‘हॉटेल चुल मटण’**चा अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. सुधारणा होईपर्यंत संबंधित हॉटेलने अन्न व्यवसाय करू नये, असे निर्देश FDAने […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करून सामाजिक कार्यात सहभागी व्हावे; चंद्रकांत पाटील

मुंबई: विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेचा सदुपयोग विधायक कामांसाठी करत सामाजिक जाणीव जोपासावी. समाजाच्या गरजा तसेच स्वतःची आवड आणि क्षमता ओळखून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. मंत्रालयात चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि वैयक्तिक अडचणी जाणून घेतल्या. यावेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या […]

अधिक वाचा..