१८ जिल्ह्यांसह राज्यभर अहिल्याभवन उभारण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी; अदिती तटकरे

महिलांना रोजगार देण्यासाठी पिंक रिक्षा योजनेअंतर्गत ५ हजार महिलांना लवकरच रिक्षा वाटप करणार मुंबई:१८ जिल्ह्यात अहिल्याभवनचे कार्य सुरू असून राज्यातील उर्वरित जिल्ह्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी अहिल्याभवन उभारण्यासाठीच्या प्रक्रियेस गती देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले. दरम्यान महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या सबलीकरणासाठी अहिल्या भवनाच्या माध्यमातून अतिशय महत्वाचे काम सुरू होणार असल्याची माहितीही […]

अधिक वाचा..

मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर होणारे विश्व मराठी संमेलन म्हणजे मराठी भाषेचा गौरव

पुणे: पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद घेत विश्व मराठी संमेलन २०२५ चे स्वरूप आणि त्यातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती दिली. ‘मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर होणारे विश्व मराठी संमेलन म्हणजे मराठी भाषेचा गौरव’, असे म्हणत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. हे भव्य संमेलन ३१ जानेवारी […]

अधिक वाचा..

वसईतील मराठी भाषेचा कुंभमेळा, साहित्य जल्लोष २०२५

मुंबई: १९९६ साली अशोक मुळेंच्या संकल्पनेतून या ‘साहित्य उत्सवा’ची मुहूर्तमेढ रोवली गेली, त्या घटनेस आज ३० वर्षे झाली. अशोक मुळे विलेपार्ल्याहून वसईला आले. त्यांना वसईचा हरितस्पर्श झाला आणि वसईला मुळे यांचा साहित्यिक परिसस्पर्श! तोच परिसस्पर्श काल (दि 2८) जानेवारी, २०२५ रोजी, विशेषतः वसईकरांसाठी, डिम्पलचे सुवर्णयुग घेऊन आला आहे. साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांच्या लेझिम, ढोल ताशांच्या […]

अधिक वाचा..

लहान कलाकारांवरील अन्याय दूर करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापन करू

मुंबई: चित्रपट उद्योगामध्ये काम करणारे कलाकार, सह-कलाकार, नायक, सह-नायक तसेच चित्रपट उद्योगांशी संबंधित कामगारांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हा अन्याय दूर करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापण्यासंदर्भात विधी व न्याय विभागाकडे विचारणा करण्याचे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. चित्रपट क्षेत्रातील लहान कलाकारांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल सिने टी व्ही असोशिएशनचे […]

अधिक वाचा..

मलेशियासोबत सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध वृद्धींगत करण्यात महाराष्ट्राचा पुढाकार

मुंबई: महाराष्ट्र आणि मलेशियादरम्यान विविध सांस्कृतिक बाबींमध्ये समानता आहे. महाराष्ट्र कृषी उत्पादने, पर्यटन अशा विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून सांस्कृतिक आणि व्यापारी क्षेत्रातील परस्पर संबंध वृद्धींगत करण्यासाठी महाराष्ट्र मलेशियाचे स्वागत करेल, असे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. मलेशियाचे महावाणिज्य दूत अहमद झुवारी युसूफ यांनी मंगळवारी राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा […]

अधिक वाचा..

मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समिती बैठक संपन्न

मुंबई: मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक मुंबई उपनगर पालकमंत्री तथा माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री, आणि सह पालकमंत्री तथा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री, यांचे अध्यक्षतेखाली काल उत्तर भारतीय संघ सभागृह, वांद्रे पूर्व येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मुंबई उपनगर जिल्ह्यातील खासदार, आमदार, […]

अधिक वाचा..

राज्य शासना तर्फे यावर्षी पासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव

मुंबई: मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले. गेल्या ६० वर्षापासून राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित […]

अधिक वाचा..

राज्यात आर्टीफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) विद्यापीठाची होणार स्थापना

कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठासंदर्भात समिती गठीत करण्याचे आदेश मुंबई: विकसित भारत 2047 मिशनच्या यशस्वी पूर्ततेसाठी आणि भारताच्या 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचालीसाठी शिक्षण आणि तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ लवकरच स्थापन करण्यात येणार आहे.यासाठी समिती गठीत करावी अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. आज मंत्रालयात उच्च व […]

अधिक वाचा..

आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील पेन्शन, नियम व अटी शिथिल करा

मुंबई: आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील पेन्शन, नियम व अटी शिथिल करून ज्येष्ठ पत्रकार/ छायाचित्रकार यांना योजनेचा लाभ मिळण्याबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात बैठक झाली. जेष्ठ अधीस्वीकृती पत्रकार कार्ड व आयकर भरावा लागत नाही या दोन कागदपत्रकारांच्या आधारे पेन्शन प्रकरणे मंजूरीचा निर्णय मंत्रालयीन अधिस्वीकृती समितीने घ्यावे असे निर्देश उपसभापती डॉ. […]

अधिक वाचा..

पुढील तीस वर्षांचा विचार करून कोरेगाव तालुक्यातील रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने करावीत

मुंबई: कोरेगाव शहरासह तालुक्यात सातत्याने होणारी वाहतूककोंडी, संभाव्य रस्तेअपघात टाळण्यासाठी ल्हासुर्णे ते कुमठे बाह्यवळण रस्ता, तसेच ल्हासुर्णे-कुमठे-वडाचीवाडी बाह्यवळण रस्त्यांची कामे पुढील तीस वर्षांचा विचार करून दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. कोरेगाव ते फलटण अंतर कमी करणाऱ्या रेडेघाट मार्गाची तातडीने पाहणी करून आराखड्यासह खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कोरेगाव (जि. […]

अधिक वाचा..