सर डॉ. भालचंद्र भाटवडेकर यांची जयंती महानगरपालिकेत साजरी

मुंबई: मुंबईच्या नागरी आणि प्रशासकीय जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे तसेच १८९८ ते १८९९ या कालावधीत तत्कालीन Bombay Municipal Corporation चे अध्यक्ष राहिलेले सर डॉ. भालचंद्र भाटवडेकर यांची जयंती आज मुंबई महानगरपालिकेत साजरी करण्यात आली. महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात असलेल्या डॉ. भाटवडेकर यांच्या अर्धपुतळ्यास महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्या […]

अधिक वाचा..

आम्ही देखील आमचं दैवत गमावलं आहे; मात्र दुर्दैवी राजकारण शरदचंद्र पवार गटाकडून केलं जातं; आनंद परांजपे

मुंबई: आम्हीदेखील आमचं दैवत गमावलं आहे. आजदेखील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते… पदाधिकारी… लोकप्रतिनिधी हे ‘दादा’ आपल्यात नाहीत या भावनेने शोकाकुल आहेत. त्यात आम्ही एकमेकांना सावरतोय… एकमेकांना धीर देतोय… पण जे काही दुर्दैवी राजकारण शरदचंद्र पवार गटाकडून केलं जातंय ते अत्यंत चुकीचे आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली […]

अधिक वाचा..

देशहित गहाण ठेवून कोणताही व्यापार करार मान्य होऊ शकत नाही

मुंबई: व्यापार करार हे आर्थिक प्रगतीचे साधन असतात, परंतु ते समान अटींवर आणि परस्पर लोकहिताच्या आधारावर असले पाहिजेत. देशाच्या सार्वभौमत्वाचा त्याग करून गुलामीकडे नेणारे करार कदापी स्वीकारार्ह नाहीत. व्यापार कराराच्या आडून देशहित आणि लोकहिताची आहुती देता येणार नाही. अमेरिकेबरोबरचा व्यापार करार हा दबावाखाली केला असून तो भारतातील अन्नदात्यांचा गळा घोटणारा आहे, असा गंभीर आरोप करुन […]

अधिक वाचा..

सचिन तेंडुलकर यांची एकनाथ शिंदे यांना ‘नंदनवन’ येथे सदिच्छा भेट; अर्जुनच्या विवाहाचे निमंत्रण

  मुंबई : भारतरत्न सचिन तेंडुलकर (sachin Tendulkar) यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची त्यांच्या ‘नंदनवन’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी सचिन यांच्या पत्नी  अंजली तेंडुलकर (Anjali Tendulkar) देखील उपस्थित होत्या. सचिन तेंडुलकर यांनी आपल्या ज्येष्ठ सुपुत्र अर्जुन यांच्या विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी ही भेट घेतली. अत्यंत स्नेहपूर्ण वातावरणात झालेल्या या भेटीत […]

अधिक वाचा..

लोककल्याणकारी राज्यासाठी शिवरायांचा विचारच मार्गदर्शक

किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आधारित लोककल्याणकारी विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवनेरी येथे केले. किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे स्मरण करून राज्याच्या विकासासाठी त्यांच्या आदर्शांचा […]

अधिक वाचा..

सत्तेसाठी विचाराशी तडजोड नाही, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भिवंडीत सेक्युलर फ्रंट..

मुंबई: भिवंडी महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवली व सर्वात जास्त ३० नगरसेवक विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या १२ नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला पण बहुमतासाठी आणखी ४ नगरसेवकांची आवश्यकता होती. भाजपा व शिंदेसेना यांच्यासोबत जायचे नाही ही काँग्रेसची भूमिका आहे त्या भूमिकेशी काँग्रेसने त़डजोड केली नाही. आता भाजपाचे काही नगरसेवक पक्षाचा आणि विचारांचा त्याग […]

अधिक वाचा..

यावर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार

यंदा तब्बल ८,३०० नवीन बसेस ताफ्यात दाखल होणार मुंबई: दैनंदिन १ ते १.५ कोटी रुपयांची तूट सहन करत आर्थिक दडपणाखाली असलेल्या एसटीला नवसंजीवनी देण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. बसेसची कमतरता हा मुख्य अडथळा दूर करत यंदा तब्बल ८,३०० नवीन बसेस ताफ्यात सामील करण्याचा निर्धार परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त […]

अधिक वाचा..

लंडनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला डॉ. नीलम गोऱ्हे यांची भावपूर्ण अभिवादन

पुणे: महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या १५ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महाराष्ट्र विधिमंडळाच्या माननीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या इंग्लंड अभ्यास दौऱ्यावर असून, दौऱ्यादरम्यान त्यांनी लंडन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देत अभिवादन केले. लंडनमधील किंग हेन्रीज रोड, कॅम्डन येथे असलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाऊस’ या ऐतिहासिक स्थळी डॉ. गोऱ्हे […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला; विक्रम पांचाळ ठार, चार आरोपींना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी

लातूर: लातूर शहरात विद्यार्थ्यांमधील वादातून झालेल्या भीषण चाकूहल्ल्यात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अटक केलेल्या चारही आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मृत विद्यार्थ्याचे नाव विक्रम नारायण पांचाळ (वय २१, रा. कुंभारवाडी, ता. रेणापूर) असे आहे. दुचाकीच्या नुकसानीच्या भरपाईच्या कारणावरून सोमवारी […]

अधिक वाचा..

दादांच्या आवाजातील बनावट एआय क्लिप्स प्रकरण; जबाबदारांवर कडक कारवाई करणार; सुनील तटकरे 

मुंबई: आदरणीय दादांच्या आवाजात खोटी व दिशाभूल करणारी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्या जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. हे कृत्य अत्यंत गंभीर आणि दंडनीय गुन्हा असून, संबंधितांनी अशा एआय-निर्मित (AI-generated) बनावट क्लिप्सचे वितरण त्वरित थांबवावे, अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील […]

अधिक वाचा..