कुर्ला विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासह रखडलेल्या विकासकामांना गती देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शिवसेना कुर्ला विधानसभा आयोजित ‘कुर्ला फेस्टिव्हल २०२६’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आमदार मंगेश कुडाळकर यांच्या विकासाभिमुख कार्याचे कौतुक करताना, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीतील संघर्षाचा फुगा आणि घराणेशाहीची वास्तवकथा

मुंबई: राजकारणात काही गोष्टी इतक्या उघडपणे घडतात की त्यावर भाष्य करण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते; फक्त डोळे उघडे ठेवण्याची गरज असते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रसारमाध्यमांतून एक चित्र रंगवले जात होते—एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि दुसरीकडे प्रफुल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातील कथित संघर्ष. पक्षात अंतर्गत गटबाजी उसळली आहे, सत्ताकेंद्रे […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची ‘स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’ सुरू

मुंबई: राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ने ‘स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’ ही एकात्मिक डिजिटल व्यवस्था सुरू केली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सेवांसाठी एकाच व्यासपीठावर सुविधा उपलब्ध होणार असून लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी सांगितले. मंत्रालयात मंत्री चंद्रकांतदादा पाटील […]

अधिक वाचा..

पुणे विषारी दारू प्रकरणाच्या तपासाला वेग; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनांनुसार सीआयडीची व्यापक कारवाई

पुणे: पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाची शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) तपासाला वेग दिला आहे. डॉ. गोऱ्हे यांनी नुकतीच सीआयडी पुणे कार्यालयाला भेट देऊन तपासाचा सविस्तर आढावा घेतला होता. त्यांच्या सूचनांनुसार तपास अधिक व्यापक आणि सर्वंकष करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात […]

अधिक वाचा..

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि मनमानी पद्धतीने रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ मुंबईतील दादर येथे काँग्रेसने तीव्र आंदोलन केले. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात निवडणूक आयोग आणि केंद्रातील भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘जब जब सरकार डरती है, पुलिस को आगे करती है’, […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना नव्या जोमाने आणि आत्मविश्वासाने कामाला लागण्याचे आवाहन केले. “वादळांना घाबरून आम्ही आमची गलबते कधी वळवली नाहीत. संघर्षाच्या या रणांगणात राष्ट्रवादी काँग्रेस कधीही मागे हटणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी […]

अधिक वाचा..

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे. नवी मुंबईतील ऐरोली येथील विक्रम बाळकृष्ण चव्हाण आणि सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शहापूर येथील अर्जुन राजेंद्र जाधव यांनी देशसेवा बजावताना सर्वोच्च बलिदान दिले. या दुःखद घटनेबद्दल उपमुख्यमंत्री यांनी शोक व्यक्त करत दोन्ही शहीद जवानांना भावपूर्ण […]

अधिक वाचा..

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून केळी उत्पादक शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते Jayant Patil यांनी केली आहे. सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये जयंत […]

अधिक वाचा..

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा निघाला असून, या ठिकाणी बिहारमधील Mahabodhi Temple संकुलाच्या धर्तीवर भव्य ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’ उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे Sanjay Shirsat यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला Anandraj Ambedkar यांच्यासह संबंधित पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक संघटना […]

अधिक वाचा..

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाचा विक्रम मोडल्याचा दावा केला जात असला, तरी गेल्या १२ वर्षांत देशासाठी त्यांच्या सरकारने नेमके काय योगदान दिले, हा संशोधनाचा विषय असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. “मोदी सरकारमध्ये ‘राम’ही नाही आणि दाखवण्यासारखे ‘काम’ही […]

अधिक वाचा..