Shekhar Pachundkar

रांजणगाव गणपती ZP गटात राजकीय आरोप-प्रत्यारोप; शेखर पाचुंदकर यांची पोस्ट व्हायरल…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात सर्वाधिक चर्चेत असलेली राजंणगाव गणपती जिल्हा परिषद गटाच्या निवडणूकीच्या प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपांना उत आला आहे. स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडवत भाजप नेते शेखर पाचुंदकर पाटील यांनी एका स्थानिक नेत्याविरोधात केलेले गंभीर आरोप आणि परखड भाष्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. त्यांच्या नावाने प्रसारित झालेल्या या विस्तृत पत्रात स्थानिक […]

अधिक वाचा..

डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे व्हिजन असलेले खासदार:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ह.भ.प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाचे आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृह नूतनीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न डोंबिवली: कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे हे व्हिजन असलेले खासदार आहेत. ज्यावेळी एखाद्या मतदारसंघाला व्हिजन असलेला लोकप्रतिनिधी लाभतो त्यावेळी मतदारसंघाचा निश्चितच कायापालट होतो. याचे उदाहरण कल्याण लोकसभा मतदारसंघात दिसून येते. खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोणतेही काम एकदा हातात […]

अधिक वाचा..

महायुती सरकारची वर्षपूर्ती पण महाराष्ट्राच्या जनतेच्या पदरी मात्र निराशाच

चंद्रपूर येथील बरांज कोळसा खाणीत नियमांचे उल्लंघन करून अवैध कोळसा उत्तखंनन करून लाखो रुपयाचा कोळसा बाजारात विकला जातोय नागपूर: महायुती सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष आज पूर्ण झाले. या एक वर्षात सरकार आपली पाठ थोपटून घेत आहेत, पंचतारांकित हॉटेल मध्ये बसून सरकार आपली उपलब्धी सांगत असले तरी जनतेच्या पदरी मात्र निराशाच आली आहे, त्यामुळे या […]

अधिक वाचा..

नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा रडीचा डाव

बुलढाण्यात शिंदेसेनेच्या आमदाराची दादागिरी; भ्रष्ट मार्गाचा अवलंब; कारवाई करण्यास पोलिसांचीही चालढकल मुंबई: नगरपालिका निवडणुकीच्या मतदानात सत्ताधारी भाजपा महायुती रडीचा डाव खेळत आहे. निवडणुका निष्पक्ष व पारदर्शकपणे पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्यच आहे पण बुलढाण्यासह राज्याच्या विविध भागात तरी तसे होताना दिसत नाही. ग्रामीण भागातून गाड्यांमध्ये भरून लोकांना बुलढाण्यात आणून बोगस मतदान केले पण पोलीस […]

अधिक वाचा..

नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षांकडून आचार संहितेची पायमल्ली, भाजपा महायुतीविरोधात हजारो तक्रारी

नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपा महायुतीचे ‘पैसा फेक तमाशा देख’ वगनाट्य रंगले… पुणे: नगरपालिका निवडणुकीत भाजपा महायुती या सत्ताधारी पक्षांनी सर्व नियम धाब्यावर बसवत आदर्श आचार संहितेचा सर्रास भंग केला. या निवडणुकीत लोकशाही व संविधानांची पायमल्ली करण्यात आली. गैरप्रकारच्या २५ नाही तर २५ हजारांपेक्षा जास्त तक्रारी झाल्या पण त्या निवडणूक आयोगापर्यंत किती पोहचल्या हा गंभीर प्रश्न […]

अधिक वाचा..

महापालिका निवडणूकांसाठी नियमावली लवकर जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी मान्य

मुंबई: दि. १ डिसेंबर २०२५ रोजी राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त यांनी बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत नगर परिषद व नगर पंचायत निवडणूकीत सुस्त असलेल्या आयोगाने अनेक आदेश निवडणूकीच्या दोन दिवसापर्यंत काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी संभ्रम निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूकासाठी नियमावली लवकर जाहीर करण्याची मागणी मी काँग्रेस पक्षातर्फे बैठकीत केली. […]

अधिक वाचा..

शिरूर नगरपालिकेची मतदान टक्केवारी 71.14 टक्क्यांवर स्थिर नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल 71.14 टक्के मतदान नोंदवले. दुपारी संथ गतीने सुरू झालेली मतदान प्रक्रिया संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत जोर पकडत बहुतेक प्रभागांत समाधानकारक टक्केवारी नोंदली गेली. शिरूर नगरपरीषदेचे एकूण मतदार 32993 असून त्यापैकी एकूण मतदान 23472 झाले आहे. प्रभागनिहाय मतदानाची आकडेवारी (५.३० वाजेअखेर): प्रभाग 1: 74.16% प्रभाग […]

अधिक वाचा..

टाकळी हाजीतील बड्या गटाविरोधात बेट भागात संतापाचे वादळ!

सततची दादागिरी, सुडाचे राजकारण आणि अधिकार्‍यांवरील दबावामुळे जनतेचा संयम सुटला…  शिरूर (अरुणकुमार मोटे): बेट भागात टाकळीहाजीतील एका बड्या राजकीय गटाविरोधात असंतोष प्रंचड शिगेला पोहोचला असून आंबेगावातील देव माणूस असलेल्या नेत्याला खोटे सांगून तरुण व नागरिकांना पोलिसांकडून अडकवण्याचा प्रयत्न होत आहे .गावोगावी तरुण आणि नागरिक आता होणाऱ्या त्रासामुळे उघडपणे विरोध व्यक्त करू लागले आहेत. गेल्या काही […]

अधिक वाचा..

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्या तरी ओबीसी आरक्षणावरील ‘टांगती तलवार’ कायम

भाजप सरकारने ओबीसी समाजाची केली दिशाभूल; विजय वडेट्टीवार चंद्रपूर: सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली नाही, हा थोडा दिलासा असला तरी या निवडणुकांचा निकाल हा न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहणार आहे. त्यामुळे ओबीसींच्या जागांवर असलेली टांगती तलवार कायम राहणार आहे. आज न्यायालयाच्या अंतरिम आदेशाने ओबीसी समाजाला दिलासा नाहीच अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय […]

अधिक वाचा..

शिवसेना–भाजप युती ही विचारधारेची युती, ही युती कायम राहणार

रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे इगतपुरी मध्ये स्पष्टीकरण नाशिक: राज्याच्या राजकारणात शिवसेना–भाजप युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट भूमिका घेतली आहे. ते म्हणाले शिवसेना–भाजप युती ही सत्ता किंवा परिस्थितीजन्य नाही. स्व. बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी विचारधारेवर ही युती घडवली आहे. त्यामुळे ही […]

अधिक वाचा..