संभाजीनगर महानगरपालिका निवडणूकसाठी 1264 मतदान केंद्र निश्चित; तुमचे मतदान कोणत्या केंद्रात? असे तपासा

महाराष्ट्र राजकीय

औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत शहरातील सर्व प्रभागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची अधिकृत व अंतिम यादी जाहीर करण्यात आली असून प्रत्येक मतदाराने आपले नाव मतदार यादीत आहे की नाही आणि मतदान केंद्र कोणते आहे हे आधीच तपासणे अत्यंत गरजेचे आहे.

मतदान केंद्रांची यादी कुठे पाहाल

अधिकृत वेबसाईटवर तपासा

https://chhsambhajinagarmc.org

महापालिका मुख्यालय

निवडणूक विभाग कार्यालय

झोन कार्यालय क्रमांक 1 ते 10

मतदान केंद्रांबाबत महत्त्वाची माहिती

शहरात एकूण 1264 मतदान केंद्र निश्चित

प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र मतदान केंद्र

नागरिकांच्या सोयीसाठी जवळच्या परिसरात केंद्रांची व्यवस्था

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध

मतदानापूर्वी काय तपासावे

आपले नाव मतदार यादीत आहे का ते तपासा

मतदान केंद्राच पत्ता आणि क्रमांक नोंदवून ठेवा

मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र सोबत ठेवा

मतदानाच्या दिवशी वेळ आणि सूचना लक्षात ठेवा

मतदानासाठी वैध ओळखपत्रे

मतदार ओळखपत्र (EPIC कार्ड)

आधार कार्ड

पॅन कार्ड

ड्रायव्हिंग लायसन्स

पासपोर्ट

शासकीय फोटो ओळखपत्र