Shivajirao Adhalrao Patil

अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यानंतर आढळराव पाटील म्हणाले…

पुणे : मी अजित पवार यांच्या सोबत जातोय या चर्चांना अजून वेळ आहे, जागावाटप झाल्यावर ठरवू असे, शिरुर मतदारसंघातील शिंदे गटाचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटले आहे. जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला शिरूरची जागा आली तर आढळराव पाटील हे अजित पवार यांच्या सोबत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाची धाकधूक वाढल्याची […]

अधिक वाचा..
ajit-pawar-amol-kolhe

अजित पवार पहाटेच अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात; म्हणाले…

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना खुलं आव्हान दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पहाटेच अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात जाऊन कामांची पाहणी केली. दुसरीकडे अमोल कोल्हे शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. अजित पवार यांच्याकडून सोमवारी (ता. २५) अमोल कोल्हे यांना खुलं चॅलेंज देण्यात आले होते. शिरूर लोकसभा जिंकून दाखवू असे अजित पवार […]

अधिक वाचा..
amol kolhe

अमोल कोल्हे यांच्या विरुद्ध शिरुरमधून अजितदादांकडून तगडा उमेदवार तयार…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाविरुद्ध निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली असून, अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अजित पवार गटाकडून शिरुरमधून कोण लढणार? या प्रश्नाची चर्चा सुरु झाली आणि तगड्या उमेदवाराचे नाव समोर आले. शिरुर येथील उमेदवार पाडणार असल्याचे अजित पवार […]

अधिक वाचा..
ajit-pawar-amol-kolhe

अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांची जोरदार टीका केली; आता पाडणारच…

पुणेः शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी जीवाचे रान केले, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. पण, आता आम्ही त्यांच्याविरोधात उमेदवार दिला तर आम्ही तो उमेदवार निवडून आणणारच आणि त्यांना पाडणारच, असे म्हणत अजित पवार यांनी दंड थोपटले आहेत. ‘एका खासदारानं जर आपल्या मतदारसंघात लक्ष […]

अधिक वाचा..

शिरुर येथे राष्ट्रवादीकडुन केंद्र सरकारच्या निषेधार्थ नायब तहसीलदारांना लेखी निवेदन

शिरुर (अरुणकुमार मोटे) कांदा पिकावरची निर्यात बंदी हटवावी आणि युवकांना रोजगार मिळावा या दोन गंभीर विषयावर संसदेच्या सभागृहामध्ये चर्चा व्हावी ही मागणी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिरुरचे खासदार अमोल कोल्हे तसेच राज्यसभा खासदारांनी संसदेच्या सुरक्षतेचा विषय चर्चेस घ्यावा अशी मागणी केली होती. या मागणीमुळे केंद्र सरकारने खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यासह 148 […]

अधिक वाचा..

राज्यात अत्यंत भयावह परिस्थिती असताना सरकारचे दुर्लक्ष आणि जनता वाऱ्यावर; नाना पटोले

नागपूर: भाजपाप्रणित सरकारने महाराष्ट्र पेटवला असून तो आधी शांत केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात वणवा पेटवून भाजपाला काय मिळते? महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, पाण्याची टंचाई आहे तसेच आरक्षणावरून महाराष्ट्र अशांत करण्याचे पाप केले जात आहे. राज्यातील परिस्थिती अत्यंत भयावह आहे. वाऱ्यावर सोडणार नाही असे मुख्यमंत्री सांगतात पण भाजपाप्रणित सरकारने जनतेला […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात पदाधिकारी झाले उदंड मात्र सर्वसामान्य लोकांच्या समस्या “जैसे थे”

शिरुर (तेजस फडके) राज्यात काही दिवसांपुर्वी मोठा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंची साथ सोडत भाजपा सोबत सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर काही दिवसातच अजित पवार शरद पवारांची साथ सोडुन भाजपा सोबत गेले आणि त्यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा सगळा गोंधळ चालु असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सत्तेसाठी […]

अधिक वाचा..

शिरुर-हवेली विधानसभा समन्वय पदाची माऊली कटके यांच्यावर जबाबदारी

मुंबईत ‘शिवसेना उद्धव गटा’च्या विशेष बैठकीत सर्वानुमते निवड शिरुर (अरुणकुमार मोटे) लोकसभा तसेच विधानसभा सन 2024 च्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने जोरदार तयारी केली आहे. दोन्ही निवडणुकीत अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी संघटनात्मक बांधणी आणि नवी रचना करीत शवसेना ठाकरे गटाचे विभागीय नेते जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये खासदार संजय राऊत यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र आणि […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिरुर-आंबेगाव तालुकाध्यक्षपदी नानासाहेब लांडे यांची निवड

रांजणगाव गणपती (तेजस फडके) येथील नानासाहेब भाऊसाहेब लांडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिरुर-आंबेगाव तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. मनसेचे नेते राजेंद्र (बाबु) वागसकर, मनसेचे राज्य सरचिटणीस अजय शिंदे तसेच मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पञ देण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार नानासाहेब लांडे यांची शिरुर-आंबेगावच्या तालुकाध्यक्षपदी नेमणूक […]

अधिक वाचा..
amol-kolhe-kawthe-yemai

राष्ट्रवादी! बापाशी कृतघ्न होवून गद्दारी करायची आमची सवय नाही…

शिरूर तालुक्यातील ४२ गावांमधील निष्ठावंत आक्रमक… शिरूर (अरुणकुमार मोटे): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) शिरूर तालुक्यातील ४२ गावांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी (ता. १९) कवठे येमाई येथे संपन्न झाला. खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि मंचर कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शेतमालाचे बाजारभाव […]

अधिक वाचा..