शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, करडे गावातील गोळीबार प्रकरणातील आरोपींना अवघ्या ७२ तासांच्या आत ताब्यात घेतल्यानंतर शिरुर पोलिसांनी वेगळाच पॅटर्न राबविला. शिरुर पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत आरोपींची शिरुर शहर आणि करडे गावातुन धिंड काढली. यावेळी पोलिसांच्या कारवाईची परिसरात मोठी चर्चा रंगली असून, ‘कायद्यात राहाल […]

अधिक वाचा..

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल जिते): मलठण–शिक्रापूर या महत्त्वाच्या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक महिन्यांपासून रखडल्याने परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे, चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे हा मार्ग अक्षरशः धोकादायक बनला असून दररोज वाहतूक कोंडी होत आहे. […]

अधिक वाचा..

खड्ड्यांनी वेढला पाबळ–कन्हेरसर रस्ता; जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास

पावसामुळे खड्ड्यांत साचले पाणी; वाहनचालक त्रस्त, तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी पाबळ (सुनिल जिते): पाबळ–कन्हेरसर हा महत्त्वाचा संपर्क रस्ता सध्या खड्ड्यांच्या विळख्यात सापडला असून वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली असून अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. या मार्गावरून दररोज शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात सर्वसामान्य दहशतीत, गुन्हेगार मोकाट; ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे केवळ ब्रीदवाक्यचं राहणार का…?

शिरूर (तेजस फडके) : महाराष्ट्र पोलिसांचे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य म्हणजे ‘सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट’ मात्र, शिरूर तालुक्यातील सध्याची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता या ब्रीदवाक्याचा अर्थच उलटा झाला आहे का? असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पोलिस ठाण्यांच्या भिंतींवर आणि वाहनांवर झळकणारे हे ब्रीदवाक्य प्रत्यक्ष कारवाईत का दिसत नाही, याचे […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

दारू प्यायची आहे…? चला किराणा दुकानात! शिरूर पोलिसांच्या हद्दीत गावठी दारूची खुलेआम विक्री…

शिरूर (तेजस फडके) : किराणा मालाच्या दुकानात सर्वसामान्यपणे धान्य, तेल, साखर, चहा, साबण आणि दैनंदिन वापराच्या वस्तू मिळतात. मात्र, शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही किराणा मालाच्या दुकानांमधून चक्क गावठी दारुची विक्री होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून पुढे येत आहेत. त्यामुळे आता “दारू प्यायची आहे…? मग दारूच्या अड्ड्यावर कशाला जाता, थेट किराणा दुकानात चला!” अशी दबक्या आवाजात […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिड महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबार; पोलिसांचा धाक संपलाय का…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन गंभीर घटना घडल्याने तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १ जून २०२६ रोजी करडे घाटात चारचाकी वाहनाला धडक देऊन करण्यात आलेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेची दहशत अद्याप कायम असतानाच १८ जुलै २०२६ रोजी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने संपुर्ण तालुका हादरला आहे. करडे येथील भैरवनाथ मंदिराजवळ आठ जणांच्या टोळक्याने एका व्यक्तीवर गोळीबार केल्याची गंभीर घटना समोर आली असून, संबंधित व्यक्तीने प्रसंगावधान राखत पाण्यात उडी मारल्याने त्याचा जीव वाचल्याचे सांगण्यात येत आहे. खात्रीलायक सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार (दि […]

अधिक वाचा..

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृताच्या गळ्यावर खोल जखम तसेच चेहऱ्यावर दुखापतीच्या खुणा आढळून आल्याने अज्ञात व्यक्तींनी त्याचा गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तलावात फेकल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हि घटना शुक्रवारी […]

अधिक वाचा..

शिरुर! पाठीवर वडाचे झाड घेऊन पंढरपूरची पायवारी; प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात युवकाचा अनोखा एल्गार

शिरुर (तेजस फडके): एकीकडे शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून वृक्षारोपण मोहिमा राबविल्या जातात, पर्यावरण संवर्धनाचे संदेश दिले जातात आणि ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा नारा दिला जातो. मात्र, दुसरीकडे एका पर्यावरणप्रेमी युवकाने स्वतःच्या कष्टातून लावलेली हजारो झाडे वाचविण्यासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा संतापजनक प्रकार शिरुर तालुक्यात समोर आला आहे. रांजणगाव सांडस गावातील […]

अधिक वाचा..

वडगाव रासाई येथे पाटबंधारे विभागाचा कालवा फोडला; अनधिकृत सायपनद्वारे पाणी वळवल्याचा आरोप

सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील वडगाव रासाई येथे पाटबंधारे विभागाच्या कालव्याला अनधिकृतपणे भगदाड पाडून पाइपलाइनद्वारे सायपन पद्धतीने पाणी वळवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे सिंचनाच्या पाणीपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शासनाच्या सार्वजनिक मालमत्तेचे सुमारे १ लाख […]

अधिक वाचा..