Shirur Police Station

शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा फायरींग प्रकरणातील दोन मुख्य सराईत आरोपी साताऱ्यातून जेरबंद

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य आणि सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणच्या पथकाने सातारा जिल्ह्यातून अटक केली आहे. या आरोपींकडून दोन गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मांडवगण फराटा येथील भैरवनाथ क्रिकेट मैदानावर […]

अधिक वाचा..

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद राहत असल्याने पारोडी व पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी टॉवर बंद केला जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असून, यामुळे मोबाईल नेटवर्क सेवा पूर्णपणे विस्कळीत होत असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, टॉवर बहुतांश वेळा नागरिक झोपल्यानंतर […]

अधिक वाचा..

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील आठवडे बाजारांमध्ये वाढत्या मोबाईल व रोख रकमेच्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत त्यांनी कोरेगाव भीमा येथील आठवडे […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे तर उपाध्यक्षपदी सुनिल जिते

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे, उपाध्यक्षपदी सुनिल जिते आणि कार्याध्यक्षपदी अर्जुन शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ. समीर राजे, राज्य उपाध्यक्ष अरुणकुमार मोटे, जिल्हा उपाध्यक्ष तेजस फडके, जिल्हा संघटक साहेबराव लोखंडे आदी […]

अधिक वाचा..
kanhur-murum-truck

शिरूर तालुक्यात महसूलचे अधिकारी कर्मचारी आरक्षण सोडतीत व्यस्त; अन मुरुम माफिया नैसर्गिक संपत्तीच्या लुटीत मस्त…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात आज (शुक्रवार) ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वार्डनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू असल्याने महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी या कामात दिवसभर पुर्णपणे व्यस्त होते. मात्र याच संधीचा फायदा घेत कान्हूर मेसाई परिसरात मुरुम माफियांनी अवैध उत्खननाचा सपाटा लावल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, कान्हूर मेसाई आणि परिसरातील काही […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक कारवाई सुरू केली आहे. एका दिवसातच पोलीस पथकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १८ वाहनांवर कारवाई करून ३७ हजार रुपये दंड वसूल केले आहेत. या कारवाईमुळे शहरात वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती निर्माण झाली असून नियमभंग […]

अधिक वाचा..

नवे पोलीस निरीक्षक, जुन्याच समस्या राहणार का? शिरूर तालुक्यात ‘ॲक्शन’ची प्रतीक्षा

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील शिरूर, शिक्रापूर आणि रांजणगाव गणपती या तीनही पोलीस ठाण्यांमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांनी पदभार स्वीकारल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत. कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होईल, गुन्हेगारीवर आळा बसेल आणि अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असली तरी केवळ अधिकारी बदलून परिस्थिती बदलेल का, हा प्रश्नही उपस्थित केला जात […]

अधिक वाचा..

वरुडे येथे घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीची गळा चिरून हत्या

शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिरूर तालुक्यातील वरुडे येथील राणमाळ वस्तीवर सोमवारी मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत घराबाहेर झोपलेल्या एका व्यक्तीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मृत व्यक्तीचे नाव बाळासो बबन तांबे (वय ४३) असे असून, ते आपल्या कुटुंबासह वरुडे येथे राहत होते. सोमवारी रात्री जेवणानंतर कुटुंबातील सदस्य घरात […]

अधिक वाचा..

मुंबईतील २८ वर्षांचा अनुभव आता शिरूरच्या सेवेत; शिरूर पोलीस ठाण्याचा विनोद पाटील यांनी स्वीकारला पदभार

संदेश केंजळे यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात बदली; शिरूरच्या कायदा-सुव्यवस्थेची धुरा आता पाटील यांच्याकडे ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांची पुणे येथील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील यांनी नुकताच शिरूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला असून त्यांच्या नियुक्तीमुळे पोलीस दलात नव्या नेतृत्वाची […]

अधिक वाचा..
jagannath-shelke

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा, जावई व नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक बाळासाहेब शेळके यांचे थोरले बंधू, माजी पंचायत समिती सदस्या दिपाली शेळके यांचे दीर तर प्रदिप माऊली शेळके यांचे ते वडील होत. पिंपळे खालसा येथील […]

अधिक वाचा..