शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न जोरात अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी, ट्रॅक्टर अन चारचाकी गाड्या…

शिरुर (तेजस फडके) सध्या पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असुन एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारुच्या नशेत वेगाने आलिशान पोर्शे कार चालवून दोघांना उडवल्याने दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची सुरुवातीला जामिनावर सुटका झाली होती. परंतु नंतर सोशल मिडीयावर नेटीझन्सने हे प्रकरण उचलुन धरल्यावर मात्र त्या मुलासह […]

अधिक वाचा..
leopard-koregaon-bhima

कोरेगाव भीमा येथील फरशी ओढ्याजवळ बिबट्याने पळवला बोकड…

कोरेगाव भीमाः कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे फरशी ओढ्याजवळ पद्माकर देवराम ढेरंगे यांच्या गोठ्यावरील पूर्ण वाढ झालेल्या बोकडला सायंकाळी साडेसहा सातच्या सुमारास बिबट्याने झडप घालत उचलून नेत शिकार केल्याने कोरेगाव भीमा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरेगाव भीमा येथील फरची ओढ्याजवळ पद्माकर देवराम ढेरंगे यांचा गायांचा गोठा आहे. शेती कामासाठी एक महिन्यापूर्वी मराठवाड्यातील एक […]

अधिक वाचा..
lonikand-traffic

लोणीकंद थेऊर फाटा वाहनांच्या दोन किलोमीटर रांगा…

लोणीकंदः लोणीकंद (ता. हवेली) येथे थेऊर फाटा वळणाला कोरेगाव भीमा कडे येणाऱ्या बाजूला व रस्त्याच्या मध्यभागी बोरवेलची गाडी पलटी झाल्याने वाहनांच्या दोन किलोमीटर रांगा लागून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. लोणीकंद येथील फाटा येथे बोअरवेलची गाडी पळली झाल्याने आज (गुरुवार) सकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. सकाळची वेळ असल्याने कंपनी कामगार, कंपनीच्या गाडी, […]

अधिक वाचा..

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या दोन्ही बाजुला वडा पाव, कच्छी दाबेली, ओली भेळ तसेच इतर फास्ट फूड खाण्यासाठी हातगाड्या उभ्या असतात. तसेच पुणे-नगर महामार्गावर (Pune-Nagar Highway) रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गावात स्वीट होमचा सुळसुळाट झाला असुन यामध्ये मोठया प्रमाणात फास्ट फुड, जंक फुडच्या नावाखाली दर्जाहिन पदार्थ […]

अधिक वाचा..

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार करत त्यांना मध्यप्रदेशतील त्यांच्या कुटुंबाकडे पुनः सोपवण्यात आल्याने महीलांसह कुटुंबीयांनी माहेर संस्थेचे आभार मानले यातील एका महिलेला मृत समजुन तिच्या कुटुंबीयांनी तर महिलेला मृत समजून सर्व विधीही केले होते. परंतु माहेर संस्थेमुळे या दोनही महिलांची पुन्हा कुटुंबासोबत भेट झाली.   […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर महामार्गाला जोडला जाणाऱ्या (L&T) एल अँड टी फाटा रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असुन त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ‘लोकांचा जीव गेल्यावर रस्त्यावरचे खड्डे भरणार आहात का…?’ असा मजकुर लिहिलेले बरेचसे फलक (Banner) या रस्त्यावर […]

अधिक वाचा..

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव वेगात असलेला मालवाहू ट्रक क्र. MH 46 BF 0068 माळवाडी येथील माऊली हॉटेल समोर वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने आज (दि 13) रोजी दुपारी 2:30 च्या सुमारास उलटल्याची घटना घडली आहे. या घटनेत ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा […]

अधिक वाचा..

आज दिवसभर प्रेक्षकांना ZEE TV वर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ चित्रपटाची पर्वणी

शिरुर (तेजस फडके) आज (दि 12) मे रोजी दिवसभर झी वाहिनीच्या विविध चॅनलवर स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सांगणाऱ्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ चित्रपट दाखविण्यात येणार असुन ZEE TV च्या विविध चॅनलवर वेगवेगळ्या वेळी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आज सकाळी ZEE मराठी चॅनलवर सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 3 ते 6 यावेळेत, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाण्यातून विषबाधा ९ शेळ्यांसह ५ मेंढ्यांचा मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे) एकीकडे दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे तहानलेल्या शेळ्या मेंढ्यानी शेतात साचलेले पाणी पिल्याने विषबाधा होऊन मेंढपाळ अंकुश सोमा कोकरे यांच्या ९ शेळ्या व ५ मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. तसेच मलठण येथे उष्माघाताने ४ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ( दि ३) घडली होती. या दुर्दैवी घटनेने […]

अधिक वाचा..

Video; केंद्र सरकारने शेतक-याच्या ताटात माती कालवली; अमोल कोल्हे

शिरुर (तेजस फडके) केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली पण ४० टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात माती कालविल्याचे काम सरकारने केलं अशा शब्दात महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ अमोल कोल्हेंनी केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर हल्लाबोल केलाय. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ अमोल कोल्हे आज (दि 3) शिरुर तालुक्याच्या दौऱ्यावर […]

अधिक वाचा..