suhas-maid

शिरूर येथील डॉ. सुहास महेंद्र मैड यांची ‘वैद्यकीय अधिकारी वर्ग-१’ पदाला गवसणी…

शिरूर तालुका

सविंदणे (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र शासनाच्या स्वतंत्र निवड मंडळातर्फे महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ संवर्गात नियुक्तीसाठी निवड प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये शिरूर येथील डॉ. सुहास महेंद्र मैड यांनी उज्वल यश प्राप्त करून ‘वैद्यकीय अधिकारी वर्ग-१’ पदाला गवसणी घातली आहे.

डॉ. सुहास यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मलठण येथे तर माध्यमिक शिक्षण विद्याधाम प्रशाला शिरूर येथे झाले आहे. पुण्यातील प्रतिष्ठित बी.जे वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय येथून त्यांनी एम.बी.बी.एस शिक्षण पूर्ण केले होते. सध्या ते शिरूर शहरातील ग्रामीण रुग्णालयात वैदयकीय आधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत. वडील महेंद्र मैड समाजकल्याण विभागात अधिकारी होते. त्यांच्या आईचे वडील शिक्षक (केंद्रप्रमुख) होते. मामा वैदयकीय आधिकारी, मावशी माधूरी बागले मलठण, टाकळी हाजी येथे मंडल आधिकारी पदावर कार्यरत आहेत.

उच्च शिक्षण घेत असताना माधुरी बागले यांनी त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. घरातील अनेकजण उच्चपदस्थ अधिकारी, व शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याने घरातूनच शिक्षणाचे धडे गिरवल्यानंतर उच्च शिक्षण घेऊन अधिकारी पदाला गवसणी घालण्याचे ध्येय सुहास यांनी लहानपणी उराशी बाळगले होते. आता त्यांनी ‘वैद्यकीय अधिकारी वर्ग-१’ पदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे त्यांच्यावर शिरुर शहरासह तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जांबूत येथे घरकुल घोटाळा ‘घरकुल दाखवा बक्षिस मिळवा’ अस म्हणण्याची लाभार्थ्यांवर वेळ…

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी बीटरूट फायदेशीर

शिरुरच्या बेट भागात वाढत्या रोहीत्र, केबल चोऱ्या अवैध धंद्यांच्या पार्श्वभुमीवर पोलीस,महावितरणची संयुक्त बैठक

दिलीप वळसे पाटील यांना भरसभेत अश्रू अनावर…

पुणे ग्रामीण पोलिस दलातील वसुलीबहाद्दरांना दाखवणार मुख्यालयाचा रस्ता…? वरिष्ठांकडून मोठ्या फेरबदलाचे संकेत