शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातुन जाणाऱ्या अतिशय वर्दळीच्या मुख्य पुणे-नगर रस्त्याच्या कडेला महिनाभरापासुन खोदकाम करुन ठेवल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असुन या कामाचे ड्रॉइंग आले नसल्याने काम बंद असल्याची माहिती देणाऱ्या आधिकाऱ्यांची व कामाची चौकशी करुन कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन शिरुरच्या प्रांताधिकारी स्नेहा किसवे यांनी दिले. यावेळी भाजपचे शिरुर शहर सचिव राजेंद्र महाजन, सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे, सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज,आपचे अवारी यांसह शहरातील नागरिक उपस्थित होते.
शिरुर शहरातुन जाणाऱ्या पुणे-नगर रस्त्याच्या कडेला गेल्या महिनाभरापासुन साधारण पाच फुट खोल व पाच फूट रुंदीचे नविन नगरपरिषद ते पाबळ-फाटा पर्यंत केलेले खोदकाम हे इंजिनिअरने ड्रॉइंग न दिल्याने बंद असल्याची माहिती बांधकाम विभागाचे पंकज काकड सांगत असल्याची ऑडिओ क्लिपच यावेळी ऐकवण्यात आली. शिरुर नगरपरिषदेचे जबाबदार अधिकारीच अशी धक्कादायक माहितीची कबुली देत असतील तर या कामास मंजुरी दिली आहे का…? दिली असेल तर ड्रॉइंग न घेता कशी दिली…? ड्रॉइंग नव्हते तर महिनाभरापासून आधीच या वर्दळीच्या रस्त्यावर खोदकाम का केले…? अपघात होऊन नागरिकांना जीव गमवावा लागला तर याला जबाबदार कोण…? असे अनेक प्रश्न निर्माण होत असुन यात मोठा भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता आहे.
त्यामुळे अशा पध्दतीने काम करणारे अधिकारी जर नगरपरिषदेत असतील तर शहरातील विकास कामांचा टक्का कसा असेल…? यांसह अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले. तसेच विविध कामानिमित्त पालिकेत येणाऱ्या नागरिकांचे म्हणणे अधिकारी ऐकून न घेता मनमानी करत असल्याचे व शहरातील विकास कामांबाबत प्रांताधिकारी किसवे यांच्या निदर्शनास आणून देत या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच खोदकाम करुन ठेवलेल्या या खड्ड्यात दोन दिवसांपूर्वीच एका वाहन चालकाचा अपघात होऊन जखमी झाले असून सुदैवाने काही अपघात होता होता टळले असल्याचे परिसरातील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.
संबंधीत काम हे वर्दळीच्या रस्त्याच्या कडेला महिनाभरापासून खोदकाम करुन ठेवलेल्या काम ड्रॉइंग येण्याआधीच काम कसे सुरु करण्यात आले याबाबत माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल.
स्नेहा किसवे
प्रांताधिकारी, शिरुर
शिरुर नगरपरिषद हद्दीमध्ये अनधिकृत गॅस पाईप लाईन त्वरित बंद करा; मनसेची मागणी