shivaji-khedkar-ranjangaon

अवैध सावकारांनी खरेदी खत करून घेतली असल्यास नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी कराव्यात…

रांजणगाव गणपती : निर्मलग्राम ग्रामपंचायत रांजणगाव गणपती यांच्या वतीने तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवाजी बबन खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ बाबत नागरिकांमध्ये जनजागृती व मार्गदर्शन करण्यासाठी सोमवारी (ता. ७) ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये बेकायदेशीर सावकारी, अवाजवी व्याज आकारणी, कर्जदारांना दिला जाणारा मानसिक त्रास, सावकारांविरोधात तक्रार करण्याची […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सात-आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड

शिरुर (तेजस फडके): अल्पवयीन मुलीला पैशांचे आमिष दाखवून तसेच धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपाने शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पॉक्सो कायदा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. दरम्यान, वैद्यकीय तपासणीत पीडित मुलगी सात ते आठ महिन्यांची […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखेसह धडाकेबाज कारवाई; महाराष्ट्र-मध्यप्रदेशात घरफोड्या करणारा सराईत चोर जेरबंद

तीन घरफोडीचे गुन्हे उघड, आरोपीविरुद्ध यापूर्वी १४ गुन्हे दाखल; १६ तोळे सोन्यासह २४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यांत घरफोडीच्या माध्यमातून चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा आणि शिक्रापुर पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातून ताब्यात घेतले. दिपक भिमराव दांडगे (वय २५, रा. घुग्री, ता. भैसदेही, जि. बैतुल, मध्यप्रदेश; सध्या रा. […]

अधिक वाचा..

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात शेतीपंपांसाठी वीजपुरवठ्याचे सध्याचे वेळापत्रक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असून, त्यातच तालुक्यात विविध भागांत बिबट्याचा वावर वाढल्याने रात्रीच्या वेळी शेतात जाणे शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. शेती पंपासाठी एका आठवड्यात दिवसा सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत […]

अधिक वाचा..

शिक्षक दिनी मलठण सोसायटीकडून गुरुजनांचा गौरव

शिक्रापूर (सुनिल जिते): शिक्षक दिनाचे औचित्य साधून मलठण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने गावातील शिक्षकांचा पेन आणि फेटा बांधून सन्मान करण्यात आला. शिक्षकांच्या शैक्षणिक तसेच सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोसायटीने हा उपक्रम राबविला. शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत असून, विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानच नव्हे, तर संस्कार देऊन त्यांना जबाबदार नागरिक घडविण्याचे कार्य […]

अधिक वाचा..

शिरुर; उरळगावच्या शेतकऱ्यांची तंत्रज्ञानाकडे वाटचाल; पीक पद्धतीवर आधारित प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

न्हावरे (अक्षय टेमगिरे) आधुनिक शेतीत बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन उत्पादनवाढ, खर्चात बचत आणि शेती अधिक फायदेशीर करण्याच्या उद्देशाने उरळगाव (ता. शिरुर) येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पीक पद्धतीवर आधारित प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. (दि. ४) रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत झालेल्या या प्रशिक्षणाला गावातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिरुर […]

अधिक वाचा..

पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून दहशत; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री धुडगूस

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या, क्रमांक नसलेल्या स्कॉर्पिओने अडवत चालक-वाहकाला शिवीगाळ व मारहाण करुन वाहकाच्या खिशातील हजारो रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेत बसच्या समोरील काचेवर दगड मारुन नुकसान करुन चक्क बसची चावी घेऊन पोबारा केल्याची धक्कादायक घटना घडली असुन याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात चार अज्ञात […]

अधिक वाचा..

जिरायत-पाबळच्या विकासासाठी एमआयडीसीची हाक; शेतकरी-नागरिक एकवटले

मुख्यमंत्री फडणवीस, उद्योगमंत्री सामंतांची भेट घेऊन निवेदन देणार पाबळ (सुनील जिते): शिरूर तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील पश्चिम भागाच्या विकासासाठी जिरायत-पाबळ परिसरात एमआयडीसी उभारण्यात यावी, अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे. या मागणीसाठी धामारी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. एमआयडीसीच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांच्या डि बी पथकाची धडाकेबाज कामगिरी; दोन म्हशी, दोन बैल आणि पिकअप वाहन असा ५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत पशुधन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शिरुर पोलिसांच्या डी.बी. पथकाला यश आले आहे. पशुधन चोरीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, चोरी गेलेल्या दोन म्हशी, दोन बैल आणि एक पिकअप वाहन असा एकूण ५ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांचा दणका; २५७ केसेस, तब्बल ३ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

शिरुर (तेजस फडके): वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणे हि प्रत्येक चालकाची जबाबदारी असते. मात्र शिरुर शहरात मात्र अनेक वाहनचालक नियमांना अक्षरशः केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र दिसत आहे. विना नंबरच्या दुचाकी-चारचाकी, वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही रस्त्यावर धावणारी वाहने आणि चारचाकीच्या काचांना नियमबाह्य काळी फिल्मिंग करुन फिरणाऱ्या वाहनचालकांवर अखेर शिरुर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. […]

अधिक वाचा..