leopard

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात दोन शेळ्या, दोन बोकड आणि एका बकराचा मृत्यू झाला, तर एका गाय जखमी झाली. या घटनेत शितल रंगनाथ राऊत (वय ३६) या शेतकरी महिलेचे अंदाजे एक लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मृत झालेल्या […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या दत्तू जाधव याला पाबळ येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील दुसरा आरोपी आणि वाहनचालक पवन सुरेश हुंडारे अद्याप फरार असल्याने तपासातील आव्हान कायम आहे. एका आरोपीला अटक झाली असली, तरी दुसरा आरोपी पोलिसांच्या हाती कधी लागणार, असा […]

अधिक वाचा..

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सुनावणीच्या तारखा पुर्वसूचना न देता रद्द होणे, बेकायदेशीर उत्खननाच्या दंडवसुलीबाबत अस्पष्टता, पक्षकारांना दालनाबाहेर तासनतास ताटकळत ठेवले जात असल्याच्या तक्रारी, कार्यालयीन वेळेनंतर सुरु असणाऱ्या कामकाजाबाबत संशय आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम १५५ अंतर्गत निकाली […]

अधिक वाचा..
sugarcane-fire

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका गावात विद्युत वाहिनीची तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे १० एकर आडसाली ऊस जळून खाक झाल्याची घटना दि ११ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka […]

अधिक वाचा..
container-fire

Video! नगर-पुणे महामार्गावर धावत्या कंटेनरच्या टायरला आग; टाकीजवळच भडका…

कारेगाव (तेजस फडके): नगर-पुणे महामार्गावर कारेगाव-रांजणगाव शिव हद्दीत LG कंपनी समोर आज (रविवार) सकाळी अकराच्या सुमारास धावत्या कंटेनरच्या (NL 01 AK 5990) टायरने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, कंटेनरच्या डिझेल टाकीजवळ असलेल्या टायरला आग लागल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, वेळीच आग आटोक्यात आल्यामुळे संभाव्य अनर्थ टळला. या घटनेमुळे महामार्गावरील वाहनचालकांमध्ये […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात दुष्काळ अन् पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांकडून घेतले जातात पैसे…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर पीक नुकसानीची पाहणी करण्याचे काम सुरू आहे. मात्र, पीक पाहणीसाठी काही महसूल सहाय्यकांकडून शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. एका गटासाठी ठराविक रक्कम निश्चित केल्याचा आरोपही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. कान्हूर मेसाई परिसरातील महसूल यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून देण्यात आला होता. […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

रांजणगाव गणपती येथे ३ ऑक्टोबर रोजी भव्य महास्वच्छता अभियान; ५ हजार विद्यार्थी…

रांजणगाव गणपती : राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त निर्मलग्राम ग्रामपंचायत रांजणगाव गणपती यांच्या वतीने शनिवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी गावामध्ये भव्य “महास्वच्छता अभियान -२०२६” आयोजित करण्यात आले आहे. या अभियानामध्ये सुमारे ५ हजार शालेय विद्यार्थी, शिक्षक, महिला बचत गट, शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, आरोग्य विभाग, सामाजिक संस्था, […]

अधिक वाचा..
draught-farmer-and-leader

शिरूरचा शेतकरी दुष्काळात होरपळतोय; लोकप्रतिनिधी वाढदिवसाच्या जल्लोषात; फ्लेक्स, बॅनर अन् वाढदिवसाच्या उधळपट्टीवर शेतकऱ्यांचा संताप…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असून, रब्बी हंगामाचीही चिंता सतावत आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चारा, पिण्याचे पाणी आणि शेतीच्या भवितव्याची चिंता घेऊन बळीराजा अक्षरशः मेटाकुटीला आला असताना, दुसरीकडे तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि काही राजकीय मंडळी मात्र वाढदिवस, फ्लेक्सबाजी, बॅनरबाजी आणि जाहिरातबाजीच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपशाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आगामी काळात शेतीसाठी पाण्याची उपलब्धता कशी राहणार, पिकांना पाणी मिळणार की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत असताना नदीपात्रातील मोठ्या प्रमाणावरील वाळू उपशाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का…? असा सवाल आता उपस्थित होत आहे. घोड धरणातील पाणीसाठा […]

अधिक वाचा..

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. बँकेच्या २०२६-२७ ते २०३१-३२ या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक होणार असून, सदस्य संस्थांच्या प्रतिनिधी निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजू लागले असल्याने सहकार क्षेत्रातील राजकीय […]

अधिक वाचा..