कान्हूर मेसाई गावच्या पाणीप्रश्नावर महत्त्वपूर्ण बैठक; राधाकृष्ण विखे पाटील साधणार शेतकऱ्यांशी संवाद

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कान्हूर मेसाई गावातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नावर आज (दि. 4) रोजी दुपारी 2 च्या दरम्यान अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत गावातील शेतकरी बांधव आणि राज्याचे जलसंपदा मंत्री तथा ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची थेट चर्चा होणार असल्याने संपूर्ण परिसराचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. […]

अधिक वाचा..
trupti-sarode

शिरूर तालुक्यातील नागरिकांचा तृप्ती सरोदे यांच्यावरचा विश्वास उडाला; कारण…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात अजित दादांच्या राष्ट्रवादी कडून तृप्ती सरोदे जिल्हा परिषदेसाठी उमेदवार म्हणून इच्छुक होत्या. परंतु, पक्षाने ऐन वेळी त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हातात घेतला. परंतु त्यानंतर काही दिवसातच त्यांनी शिवसेनेकडून दाखल केलेली उमेदवारी मागे घेत सगळ्यांनाच अनपेक्षित धक्का दिला. काही करून निवडणूक लढविणारच, […]

अधिक वाचा..
jyoti-pachundkar

रांजणगाव-कारेगाव मूळ गटाचा कायापालट करणार : ज्योती मानसिंग पाचुंदकर

कान्हूर मेसाई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विकासाच्या संकल्पनेला अभिप्रेत असलेला रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गट नागरिकांची समस्या सोडवून प्रगतीपथावर आणून त्याचा कायापालट करणार आहे, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार ज्योती मानसिंग पाचुंदकर यांनी दिले आहे. View this post on Instagram रांजणगाव कारेगाव मुळ जिल्हा परिषद गटात अंतर्गत रस्ते, सांडपाणी, […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात ३ लाखांहून अधिक मतदार; ७ फेब्रुवारीला मतदान, ९ फेब्रुवारीला मतमोजणी

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी एकूण ३ लाख १ हजार ९५६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १ लाख ५३ हजार ४२५ पुरुष, १ लाख ४८ हजार ५१८ महिला आणि १३ इतर मतदार यांचा समावेश आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७ गटांपैकी पाबळ गटात सर्वाधिक ४६ हजार ६२० मतदार […]

अधिक वाचा..

पाबळ हादरले! घरगुती वादातून विवाहितेची दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या 

पाबळ (सुनिल जिते): पाबळ (ता. शिरूर) येथे पतीकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी महिलेच्या पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. राजू पांडुरंग जाधव असे आरोपी पतीचे नाव असून अहिला उर्फ भाग्यश्री राजू जाधव (वय ३०), […]

अधिक वाचा..

लाडक्या लोकनेत्याला सहकार क्षेत्राचा सलाम; विकासाचे शिल्पकार अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली

शोकसभेत आठवणींच्या भावनांचा फुटला बांध शिरूर (सुनिल जिते): उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी रविवार (ता.०१) शिरूर येथे शोकसभा पार पडली.शिरूरच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्राने एक कर्तबगार, दूरदृष्टी असलेला आणि जनतेसाठी अखंड झटणारा नेता गमावला असून शिरूरसाठी ही हानी असल्याची भावना शिरूर गटसचिवाच्या वतीने व्यक्त […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात निवडणूक रणधुमाळी! राष्ट्रवादीचा प्रभाव वाढतोय तर भाजपसमोर मोठं आव्हान…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा परिसरात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार सध्या चांगलाच रंगात आला आहे. गावोगावी सभा, बैठका, संपर्क दौरे यामुळे संपूर्ण भागात राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणूक प्रचाराला वेगळेच वळण मिळाले आहे ते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे. मांडवगण-वडगाव रासाई गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुजाता पवार, भारतीय जनता पक्षाचे […]

अधिक वाचा..
shirur-gramin-navre-zp

शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात वृषाली वाळके, दीपक कोहकडे व स्वाती घावटे यांना वाढता प्रतिसाद…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटामध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या गटातील निवडणूक लढतीत वृषाली वाळके, दिपक कोहकडे आणि स्वाती घावटे या उमेदवारांना मतदारांकडून वाढता आणि सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रचाराच्या प्रत्येक फेरीत जनतेचा उत्स्फूर्त सहभाग आणि स्थानिकांचा विश्वास हे या तिन्ही उमेदवारांच्या बाजूने झुकत असल्याचे चित्र […]

अधिक वाचा..

अक्षय नाणेकर यांचा झंझावाती प्रचार; उत्स्फूर्त प्रतिसाद

पाबळ (सुनिल जिते): कारेगाव -कान्हूर मेसाई पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अक्षय नाणेकर सध्या संपूर्ण मतदारसंघात झंझावाती प्रचार करीत असून, त्यांचा प्रचार दिवसेंदिवस अधिकच वेग घेत आहे. गावोगाव, वाडी-वस्तीवर जाऊन थेट मतदारांशी संवाद साधत असल्याने त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत होत असून, कान्हूर -कारेगाव […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात ७ जिल्हा परिषद, १४ पंचायत समिती जागांसाठी थेट, चौरंगी व पंचरंगी लढती

शिरुर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात सुरु असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनी अंतिम टप्प्यात कमालीची राजकीय रंगत घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले असून जिल्हा परिषदेच्या ७ जागांसाठी २० उमेदवार तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी तब्बल ४६ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्यात यंदा थेट लढतींसह […]

अधिक वाचा..