शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शिरूर (अरुणकुमार मोटे): शहरातील गुजरमळा परिसरात दि.१५ मे च्या रात्री ते दि. १६ मे च्या सकाळी दरम्यान एका बांधकामस्थळी चोरीची गंभीर घटना घडली असून, अज्ञात चोरट्याने तब्बल 65,000 रुपये किंमतीचे बांधकाम साहित्य चोरून नेल्याची फिर्याद शिरूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे स्थानिक बांधकाम व्यावसायिकांमध्ये चिंता आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, फिर्यादी अमोल बाबाजी एरंडे (वय २९) व्यवसाय – कॉन्ट्रॅक्टर, रा. बाबुरावनगर, शिरूर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, मौजे गुजरमळा, शिरूर येथील डॉ. राम मगर यांच्या बांधकाम प्रकल्पात त्यांनी स्वतःच्या मालकीचे बांधकाम साहित्य ठेवले होते.
१५मे रोजी रात्री ८ वाजता ते १६ मे रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने मुद्दाम लबाडीच्या उद्देशाने त्यांच्या फायद्यासाठी हे साहित्य चोरून नेले. सदर घटना लक्षात येताच त्यांनी तत्काळ शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.यामध्ये लोखंडी जॉक्स – 23 नग (एकूण किंमत: ₹23,000/-,लोखंडी चॅनेल – 6 नग (एकूण किंमत: ₹18,000/- लोखंडी टाय रॉड – 48 नग (एकूण किंमत: ₹16,000/-,कॉलमसाठी लोखंडी चॅनेल – 8 नग (एकूण किंमत: ₹8,000/-, असा एकूण 65,000/-रु मुद्देमाल चोरीला गेलेला आहे.
या बाबत शिरूर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरटया विरूद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार जगताप हे करत आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक कार्यरत आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.
स्थानिक नागरिकांत आणि व्यावसायिकांत भीतीचे वातावरण
या प्रकारामुळे परिसरातील बांधकाम व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक दक्षता घ्यावी, अशी मागणी होत आहे.पुढील तपास सुरू असून लवकरच आरोपीचा छडा लावण्यात येईल, असा विश्वास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी व्यक्त केला आहे.