Jio ग्राहकांसाठी जबरदस्त प्लॅन! अमर्यादित कॉलिंग वर्षभरासाठी कसा तो पहा…

नवी दिल्ली: दूरसंचार कंपन्या जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्रीपेड प्लॅन बाजारात आणत असतात. टेलिकॉम कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु आहे. अशात जिओ अनेकदा आपल्या यूजर्ससाठी नवनवीन प्लान आणत असते. आता कंपनीने आणखी एक नवीन प्लॅन आणला आहे. या प्लानमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह अनेक सुविधा मिळतात. आपण अशाच एका स्वस्त जिओ प्लॅनबद्दल जाणून […]

अधिक वाचा..

VI च्या दोन कोटींहून अधिक ग्राहकांचा डाटा उघड्यावर? कसा तो पहा…

मुंबई: सायबर सुरक्षेबाबत संशोधन करणारी संस्था सायबर एक्स ९ कडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. VI या टेलिकॉम कंपनीच्या सिस्टममध्ये असलेल्या काही गोंधळांमुळे २ कोटी ग्राहकांचा कॉल डेटा उघड्यावर पडला आहे. कधी, कोणी, कोणाला फोन केला, किती वेळ बोलणं झालं, हे सगळंच्या सगळं आता जाहीर झालं आहे. VI ची पोस्टपेड सेवा घेतलेल्या ग्राहकांचा डेटा आता […]

अधिक वाचा..

…त्यामुळे या सरकारला वठणीवर आणायलाच हवे

हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचा कार्यकर्ता मेळावा पार… वर्धा हिंगणघाट: महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांना प्राधान्याने मदत केली जात होती. कर्जमाफी करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला जात होता. मात्र हे सरकार आमदार सांभाळण्यात व्यस्त आहे. या सरकारचा महाराष्ट्र हा ४० आमदारांपूरताच मर्यादित आहे. त्यामुळे या सरकारला वठणीवर आणायला हवे, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा […]

अधिक वाचा..

मोसंबीला लागलेल्या बुरशी रोगाची अंबादास दानवे यांनी केली पाहणी

जालना: जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बहिरगड गावात राहणाऱ्या राधाकिसन दिवटे या शेतकऱ्याच्या मोसंबी बागेची पाहणी आज (दि. 28) रोजी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. मोसंबीला बुरशी रोगाची लागण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अद्याप शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे देखील झाले नाही. त्यांना मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दानवे […]

अधिक वाचा..

जलपरीसारख्या बालकाचा जन्म, पाहणाऱ्यांची गर्दी…

शिवपुरी: शिवपुरिमध्ये जलपरीसारख्या बालकाचा जन्म झाला आहे. या बालकाला ना लैंगिक अवयव आहेत ना त्याला पाय आहेत. मुलाच्या शरीराचा खालचा भाग हुबेहूब जलपरीसारखा दिसतो. या मुलाच्या जन्मानंतर जलपरीसारखे मूल जन्माला आल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. या मुलाला पाहण्यासाठी लोकांचीही गर्दी होत आहे. शिवपुरीच्या भोडण गावात राहणाऱ्या भावना नावाच्या महिलेला प्रसूती वेदना होत असल्याने तिला मानपुरा […]

अधिक वाचा..

तब्बल 6 फूट लांब केसांचा विक्रम; सुकन्येची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

सांगली: मुळची सांगलीची सुकन्या श्रद्धा सुदर्शन सदामते हिला सन २००५ मध्ये एका अपघातामुळे केशवपन करावे लागले तीने आपले केस वाढवण्याचा विचार केला आणि तो जिद्दीने अंमलात आणत केसांना कधीही कात्री न लावता चांगले ६ फुट केस वाढवले. त्याच जिद्दीचे फळ म्हणून तिच्या 6 फुटी केसांची नोंद इंडिया बुकने ऑफ रेकॉर्डमध्ये घेतली आहे. सांगली विश्रामबाग येथे […]

अधिक वाचा..

गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफीची सवलत: एकनाथ शिंदे 

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी शनिवार (दि. २७) ऑगस्टपासून करण्यात येत आहे. मुंबई – बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत दि. ११ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

अधिक वाचा..

बैल धुण्यासाठी तलावाजवळ गेलेल्या काका पुतण्याला तिथेच मृत्यूने गाठले…

औरंगाबाद: महाराष्ट्रात दरवर्षी बैल पोळा सण साजरा केला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा हा सण साजरा केला जातो. आज बैलपोळा सणादिवशीच हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यात बैल धुण्यासाठी गेलेल्या काका पुतण्याचा बुडून मृत्यू झाला. कचरु काळे (वय 33) आणि रितेश अजिनाथ काळे (18) अशी मृत काका पुतण्याची नावे आहेत. […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेल दर…

मुंबई: महागाईमधील चढ उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल दर ठरवित असतात. त्यामुळे पेट्रोल डिझेल दरांवर नियंत्रण राहणे गरजेचे असते. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर ठरतात. त्याचा परिणाम सर्वसामान्यांचा रोजच्या वापरातील वस्तुंच्या दरांवरही पडत असतो. त्यामुळे नागरिकांचे नेहमीच पेट्रोल डिझेल दरांकडे लक्ष असते. जाणून घ्या आजचे दर काय आहेत. आजचा पेट्रोल […]

अधिक वाचा..

थिएटर लोकप्रिय होण्यास थिएटर स्टार निर्माण व्हावेत: अंजन श्रीवास्तव

पुणे: थिएटर व्यावसायिकदृष्ट्या लोकप्रिय होण्यास थिएटर स्टार निर्माण व्हावेत. त्यामुळे थिएटर अधिक समृद्ध होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ सिने नाट्य कलावंत अंजन श्रीवास्तव यांनी येथे केले. सिनेक्षेत्रातील मान्यवर कलावंतांच्या कार्य कर्तुत्वाची माहिती असलेल्या डॉ. राजू पाटोदकर लिखित ‘चंदेरी सितारे’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात बुधवारी झालेल्या या समारंभाच्या वेळी […]

अधिक वाचा..