मुद्द्याची लढाई गुद्यावर आली, मित्रानेच केला चाकूने सपासप वार…

क्राईम

परभणी: परभणीमध्ये मनसे शहर प्रमुखाची हत्या करण्यात आली आहे. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास हत्येची ही थरारक घटना घडली. परभणीतील मनसे शहर प्रमुख सचिन पाटील यांचा खून करण्यात आला. किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. संपूर्ण परभणी जिल्ह्यात हत्येच्या या घटनेनं खळबळ उडाली आहे.

किरकोळ वादातून हत्या?

सचिन पाटील हे मनसेचे शहर प्रमुख होते. किरकोळ वादातून त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. खरंच या हत्येमागे शुल्लक कारण होतं की आणखी काही वाद होता, याचं गूढ उकलण्याचं आव्हान पोलिसांसमोर आले आहे. त्यानुसार पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. सचिन पाटील यांच्या मित्रानेच हे हत्याकांड रचलं, अशीही शंका पोलिसांना आहे.

गुन्हा दाखल, अटक कधी?

नवा मोंढा पोलीस ठाण्यात मनसे शहर प्रमुख सचिन पाटील यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येचा छडा लावण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे. अद्याप या हत्येप्रकरणी कुणालाही ताब्यात घेतल्याची किंवा अटक करण्यात आल्याची माहिती नाही. सचिन पाटील यांच्या कुटुंबीयांकडून, त्यांचे फोन रेकॉर्ड तपासून तसंच इतरांच्या चौकशीतून या हत्येचा छडा लावण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केलाय. नेमकं या हत्येमागे कुणाचा हात आहे, हे लवकरच स्पष्ट होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सचिन यांच्या हत्येनं त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तरुण मुलगा गमावल्यानं पाटील कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. सचिनच्या हत्येची कसून चौकशी केली जावी आणि दोषींना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी पाटील कुटुंबीयांनी केली आहे.