crime

जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी; नऊ जणांवर परस्परविरोधी गुन्हे

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): पारोडी (ता. शिरुर) येथे वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये हमाणारी झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे राजेंद्र शेडगे, विकास शेंडगे, योगेश शेंडगे, ज्ञानेश्वर तुकाराम पिंगळे, अशोक हरिभाऊ शेंडगे, लंका अशोक शेंडगे, किरण अशोक शेंडगे, ज्योती चोरमले, लता थोरात या 9 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पारोडी (ता. शिरुर) येथील अशोक शेंडगे व राजेंद्र शेंडगे यांच्या घरी त्यांचा भाचा ज्ञानेश्वर पिंगळे आलेला असताना वडिलोपार्जित जमिनीबाबत चर्चा होत दोघांमध्ये वाद झाला, वादाचे रुपांतर शिवीगाळ दमदाटी मध्ये होत हाणामारीत झाले यावेळी दोन्ही गावातील काही सदस्यांनी काठीने मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत अशोक हरिभाऊ शेंडगे व सुनिता राजाराम शेंडगे दोन्ही रा. पारोडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

याबाबत शिक्रापूर पोलिसांनी राजेंद्र शेडगे, विकास शेंडगे, योगेश शेंडगे, ज्ञानेश्वर तुकाराम पिंगळे, अशोक हरिभाऊ शेंडगे, लंका अशोक शेंडगे, किरण अशोक शेंडगे, ज्योती चोरमले सर्व रा. पारोडी (ता. शिरुर) जि. पुणे, लता थोरात रा. दहिटणे ता. दौंड जि. पुणे यांच्या विरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल चव्हाण करत आहे.