संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील बजाज नगर येथे एका मोठ्या उद्योजकाच्या घरी दरोडा टाकणाऱ्या संशयित आरोपी अमोल खोतकरचा मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला आहे.
एन्काऊंटरची थरारक घटना – स्टेप बाय स्टेप
पोलिसांच्या गुन्हे शाखेला माहिती मिळाली की अमोल खोतकर वाळूजमधील कोल्हाटी परिसरात लपून बसलेला आहे.
त्यामुळे सह-पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पथक वडगाव कोल्हाटी येथे पोहोचले.
पोलिसांनी अमोल खोतकरला अटक करण्याचा प्रयत्न केला.
त्याने पोलिसांना पाहून पळ काढला आणि…
पोलिसांच्या अंगावर गाडी घालून एक पोलीस कर्मचारी जखमी केला.
त्यानंतर अमोलने रिव्हॉल्व्हर काढून पोलिसांवर गोळीबार केला.
पोलीस पथकाने प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.
या चकमकीत अमोल खोतकर ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरोड्याची सविस्तर माहिती
15 मे रोजी पहाटे उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा पडला होता. त्यावेळी संतोष लड्डा कुटुंबासह परदेशात होते आणि त्यांचा केअरटेकर बंगल्यात होता. दरोडेखोरांच्या टोळीने केअरटेकरच्या डोक्याला बंदूक लावून घरातील आठ किलो सोने, 40 किलो चांदी आणि रोख रक्कम लुटून नेली होती.
पोलीस तपास
या गुन्ह्याचा तपास सुरू केल्यानंतर पोलिसांनी यापूर्वीच पाच आरोपींना अटक केली होती. अमोल खोतकर हा या प्रकरणातील सहावा आरोपी होता. त्याच्याकडेच चोरीचा मुद्देमाल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यामुळे पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले होते.