स्त्री आधार केंद्राचे कार्यकर्ते आर.डी शेलार यांचे दुःखद निधन…

महाराष्ट्र

शेलार गुरुजी हे आंबेडकरी चळवळीचे खरे सुपुत्र होते; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: रमेश शेलार उर्फ आर.डी. शेलार गुरुजी यांच (दि. २८) जुलै सकाळी दुःखद निधन झाले. ते १९८१ सालापासून स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनानुसार सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत होते. त्यांच्या या कामाबरोबरच त्यांनी किर्लोस्कर कमिन्स कंपनीमध्ये कामगार म्हणून बराच काळ काम केले.

कामगार चळवळ, डॅा. बाबासाहेब आंबेडकर चळवळ आणि स्त्री आधार केंद्राचं काम या सगळीकडे शेलार गुरुजी हे विविध गीते तयार करून त्यामधून महिलांची जागृती करण्याचे काम करत होते. स्त्री आधार केंद्रामध्ये जवळजवळ पाच दशके काम करत असताना त्यामध्ये काही काळ त्यांनी विविध प्रकल्पांमध्ये काम केलं होते. या कामाच्या निमित्ताने लातूर, धाराशिव, जळगाव, नगर, नगर जिल्ह्यातील कोठेवाडी, सातारा, सांगली हा विदर्भातील अनेक जिल्हे या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकठिकाणी सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता.पुणे शहरातील पोलिसांचे संवेदनशीलता वाढवण्याच्या कामामध्ये शेकडो केसेस मध्ये त्यांनी मदत केलेली होती. त्याचबरोबर विविध ठिकाणी कायद्याची आणि आरोग्याची माहिती देणे,पोस्टर प्रदर्शन, प्रशिक्षण शिबीरे, याच्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. रमेश शेलार यांच्या पत्नी श्मानिनी शेलार, मुलगी ऍड. योगिता, मुलगा ऍड. योगेश या सर्वांच्या दुःखामध्ये स्त्री आधार केंद्र व त्याच्या सर्व विश्वस्त या सहभागी आहेत. स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे तसेच अन्य विश्वस्त मीना इनामदार, मृणालिनी कोठारी, जेहलम जोशी, अपर्णा पाठक, मुक्ता करंदीकर, डॅा. मुग्धा केसकर या सगळ्यांनी शेलार कुटूंबियांसमवेत सहवेदना व्यक्त केलेली आहे.

ज्यावेळी शेलार यांना हृदयाचा धक्का आला त्यावेळी शेवटच्या वेळी आश्लेषा, अनिता, अपूर्वा व सल्लागर विश्वस्त अपर्णा पाठक यांनी सुश्रुशेसाठी प्रचंड धावपळ केली. परंतु तीव्र असा हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन पहिल्या झटक्यातच झालेले होते. त्यांना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केलेले आहे. हजारो स्त्रियांचे आर डी शेलार हे गुरुजी म्हणून परिचित असलेले कार्यकर्ते महिलांच्या चळवळीमध्ये त्यांनी फार मोठे योगदान दिले असे आंबेडकरी चळवळीचे खरे सुपुत्र म्हणून त्यांचे नोंद इतिहासात होईल, अशी देखील भावना डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केलेली आहे.