जातेगावच्या व्यंकटेशकृपा कारखान्यातील घटना
शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील व्यंकटेश कृपा शुगर मिल्स कारखान्याच्या ऊस तोड ठेकेदारास ऊस तोडणीसाठी कामगार पुरवितो असे म्हणून तब्बल 5 लाख 50 हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे किरण नथू पाटील या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स येथे नितीन शिंदे यांचा ऊसतोड करुन कारखान्याला पुरवण्याचा ठेका असून ते ऊस तोडणीसाठी वेगवेगळ्या ठिकाण हून ऊसतोड कामगार आणत असतात त्यांच्या व्यवसायातून त्यांची किरण पाटील या व्यक्तीसोबत ओळख झाली. त्यानंतर किरण पाटील यांनी यांनी ऊसतोड कामगारांना ऍडव्हान्स मध्ये पैसे देण्यासाठी काही पैशांची वेळोवेळी मागणी केली असता नितीन शिंदे यांनी वेळोवेळी त्यांच्या बँक खात्यातून पाटील यांना तब्बल 5 लाख 50 हजार रुपये पाठविले.
मात्र त्यानंतर देखील कामगार येत नसल्याने पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे शिंदे यांच्या निदर्शनास आल्याने याबाबत नितीन तुकाराम शिंदे (वय ४८) रा. माळीमळा लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी किरण नथू पाटील रा. हनुमंतखेडा ता. पारोळा जि. जळगाव या इसमावार फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष शिंदे हे करत आहे.