शिक्रपुरातील कचरा वाहतुकीसाठी ग्रामपंचायतच्या वतीने सहा ट्रॉली नागरिकांच्या सेवेत…

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापुर (ता. शिरुर) येथील कचरा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय झालेला असताना यापूर्वी झालेल्या ग्रामसभेत कचरा संकलित करण्यासाठी ट्रॉली बनवण्याचे ठरलेले असताना नुकतेच ग्रामपंचायतच्या वतीने सहा ट्रॉली नागरिकांच्या सेवेत देण्यात आल्या आहेत.

शिक्रापूर (ता. शिरुर) गावातील कचरा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने नुकत्याच सहा ट्रॉली नागरिकांच्या सेवेत देण्यात आल्या आहे. याप्रसंगी सरपंच रमेश गडदे, उपसरंच विशाल खरपुडे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे, माजी उपसरपंच सुभाष खैरे, मयूर करंजे, ग्रामपंचायत सदस्य सारिका सासवडे, त्रिनयन कळमकर, पूजा भुजबळ, उषा राऊत, सीमा लांडे, चेअरमन गणेश लांडे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी राऊत यांसह आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायतने गावातील कचरा समस्या सुटसुटीत व्हावी यासाठी ग्रामपंचायत निधीतून सुमारे सात लाख रुपये किमतीच्या ट्रॉली खरेदी केल्या आहेत. सध्या प्रत्येक वॉर्डनिहाय या ट्रॉली कचरा संकलित करतील. ट्रॉलीमध्ये ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी दोन भाग या मध्ये करण्यात आलेले असून नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळ्या चेंबर मध्ये संकलित करावा असे आवाहन देखील ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.