shirur-tehsil-office

शासकीय सुट्टीचे दिवशी दुय्यम निबंधक कार्यालय सुरू राहणार; पाहा तारखा…

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): दि. २९, ३० व ३१ मार्च २०२४ रोजी शासकीय सुट्टी असूनही दुय्यम निबंधक (दस्त नोंदणी) कार्यालय सुरू राहणार असल्याचे निर्देश नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिलेले आहेत.

नवीन वार्षिक मूल्यदर तक्ते ०१ एप्रिल रोजी प्रसिद्ध होत असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात मार्च महिन्यात दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची गर्दी होत असते. तसेच आर्थिक वर्ष २०२३-२०२४ या वर्षाचा इष्टांक पूर्ण पूर्ण करण्याच्या दृष्टीने व महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना या संबंधीचे कामकाज करण्यासाठी, त्याचप्रमाणे दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची गर्दी वाढत असल्याने, त्याकामी पक्षकारांची गैरसोय होऊ नये, यासाठी जनहितास्तव दि. २९, ३० व ३१ मार्च २०२४ या शासकीय सुट्टीचे दिवशी राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवणेचे निर्देश नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक,महाराष्ट्र राज्य,पुणे यांनी दिलेले आहेत.

दरम्यान, त्याअनुषंगाने दि. २९, ३० व ३१ मार्च २०२४, या शासकीय सुट्टीचे दिवशी इतर सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांबरोबरच दुय्यम निबंधक, शिरुर हे कार्यालय देखील कार्यालयीन वेळेत सुरू राहील. सदर सुविधेचा जनतेने अवश्य लाभ घ्यावा,असे आवाहन शिरूरचे दुय्यम निबंधक अनिल जगताप यांच्याकडून करण्यात आलेले आहे.

Video: शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाया पडले अमोल कोल्हे…

तिरंगी लढत! शिरूर लोकसभेच्या निवडणूकीत उतरले मंगलदास बांदल…

शिरुर; वाळू माफियांची महसुलच्या अधिकारी अन कर्मचाऱ्यांना नऊ बकऱ्यांची कंदुरी, पार्टीत दारु पिऊन अधिकारी झिंगाट

शिरुरमधील ‘त्या’ युवकाच्या आत्महत्येचे कारण आले समोर; प्रेमसंबंधातून मारहाण अन् गळफास…

रांजणगाव-बाभुळसर अष्टविनायक महामार्गावर अपघातात एका महिलेचा मृत्यू; वाहनचालक फरार